Take a fresh look at your lifestyle.

आमदार निलेश लंके यांनी दिला विजयराव औटींना ‘असा’ सल्ला !

म्हणाले पराभव झाल्यानंतर थोडं शांत बसा ना !

 

पारनेर : मला कोणीतरी म्हटले की हा रात्री बारा वाजेपर्यंत काय करतो तर मी बारा वाजेपर्यंतही गोरगरिब लोकांना मदत करण्याचे काम करतो तुमच्या सारखे आठ वाजताच बसत नाही असा उपरोधिक टोला लगावत पराभव झाल्यानंतर तरी जरा शांत बसा ना असा सल्ला आमदार निलेश लंके यांनी विजय औटी यांना दिला. परवा झालेल्या शिवसेना मेळाव्यात माजी आमदार विजयराव औटी यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर टीकेची झोड उठवली होती याला आमदार लंके यांनी जोरदार शब्दात प्रत्युत्तर दिले.
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर महाविद्यालयाच्या 20 लाख रुपये खर्चाच्या रस्ता कामाचा प्रारंभ आ. निलेश लंके व माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आला. यावेळी आ.लंके बोलत होते. माजी सभापती राहुल झावरे, प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, विश्वस्त सीताराम खिलारी, माजी सभापती गंगाराम बेलकर, मारूती रेपाळे, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र पाटील, दूध संघाचे अध्यक्ष संभाजी रोहोकले, जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई वराळ, सरपंच अरुणा खिलारी, उपसरपंच सुनील चव्हाण, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर, दादाभाऊ सोनावळे, शैलेंद्र औटी, राजेंद्र चौधरी, वनकुट्याचे सरपंच राहुल झावरे, सचिन पठारे, सरपंच प्रकाश गाजरे, सरपंच अप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब खिलारी, सचिन पठारे, दत्तात्रय निवडूंगे, दत्तात्रय कोरडे, भागुजी झावरे, जालिंदर वाबळे, पो. द. साळुंके, किरण ठुबे, रामा तराळ, भाऊसाहेब झावरे, शूभम गोरडे, महेश झावरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की पराभवानंतर नैराश्य आल्याने काही जण बाष्कळ बोलत आहेत परंतु ‘ कम से कम पचास बरस ‘ निलेश लंके आमदार राहणार असल्याचेही दस्तुरखुद लंके यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते माजी आ. नंदकुमार झावरे म्हणाले, पारनेर विधानसभा मतदारसंघात आ. लंके यांचे चांगले काम आहे. त्यामुळे आ. लंके यांनी वरच्या निवडणुकीचा विचार करू नये. तालुक्यातील जनतेला व प्रश्नांना जर न्याय द्यायचा असेल तर तालुक्यातच काम करा. पारनेर तालुक्यातून मोठे राजकीय भवितव्य आहे. आर. आर. पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून काम केले पाहिजे. आ. लंके यांचे कोरोना काळातील आदर्श काम महाराष्ट्रासह जगाने पाहिले आहे्.त्यामुळे त्यांच्या कामांसाठी कुणाच्या साक्षीची गरज नाही. त्यांचे काम देशात पोहोचले आहे. मान खाली घालून ते ऐकून घेतात. त्यांच्यातील नम्रपणा त्यातून दिसून येतो. तालुक्यातील जनतेने 61 हजार मतांनी निवडून दिले आहे, जनतेचा कौल मान्य करा, असेही माजी आमदार झावरे म्हणाले.
आमदार लंके म्हणाले, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिवंगत खासदार शंकरराव काळे व सॉलिसीटर गुलाबराव शेळके यांनी तालुक्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले. त्यानंतर सर्वात जास्त शिक्षकांना तालुक्यात व जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देणारी जिल्हा मराठा शिक्षण संस्था आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजु आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम जिल्हा मराठा शिक्षण संस्थेने केले. गुणवत्ता व दर्जा टिकवून शिक्षणाची दारे खुली केली. माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा रस्ता भेट द्यायचा होता. शून्यातून विश्व निर्माण करणारे हे नेतृत्व आहे. विधानसभा निवडणुकीत बोलवून एक सामान्य कुटुंबातील सदस्य असताना मदत केली आहे.
जिल्हा मराठा शिक्षण संस्थेमध्ये गोरगरीब मुलांना शिक्षण व अधिकारी बनविण्याचे काम केले आहे. शिक्षण संस्थेसाठी सर्वातोपरी मदत करण्यास तयार आहे, तुम्ही हक्काने सांगा, असे आमदार लंके म्हणाले. माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी सुपा औद्योगिक वसाहतीत बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यातील काही जण आमवस्या-पौर्णिमेला बाहेर येतात, सल्ला देतात आणि निघून जातात, असे सांगत नामोल्लेख टाळत माजी आमदार विजय औटी यांच्यावर टिका केली.