Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूडमध्ये “या’ कलाकारांनी हृदयविकारामुळे घेतला जगाचा निरोप!

त्याबाबत जाणून घेऊयात...

 

सिद्धार्थ शुक्‍ला या उमद्या अभिनेत्याच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूड आणि टीव्ही जग शोकात आहे. 40 वर्षांच्या सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्‍याने अचानक निधन झाले. एवढ्या लहान वयात त्याने जगाचा निरोप घेतला यावर कोणाचाच विश्‍वास बसत नाही. केवळ सिद्धार्थच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कमी वयातच हृदयविकाराच्या झटक्‍याने जगाचा निरोप घेतला आहे. त्याबाबत जाणून घेऊयात..

▪️राज कौशल : अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती निर्माते आणि दिग्दर्शकराज कौशल यांचेही हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय अवघे 50 वर्षे होते. 

▪️राजीव कपूर : रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांचे धाकटे बंधू राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. रणधीर कपूर यांच्या घरी असताना राजीव यांना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यावेळी राजीव कपूर यांचे वय 58 वर्षे होते.

▪️संजीव कुमार : त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेते संजीव कुमार यांनी वयाच्या 48 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 6 नोव्हेंबर 1985 रोजी संजीव कुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. अचानक आलेल्या या बातमीने संपूर्ण देशाला धक्‍का बसला. 

▪️इंदर कुमार : अभिनेते इंदर कुमार यांनी देखील कमी वयातच हे जग सोडले. 4 जुलै 2017 रोजी इंदर कुमार यांना झोपेतच हृदयविकाराचा झटका आला. यावेळी ते 43 वर्षांचे होते. 

▪विनोद मेहरा : देखणे अभिनेते विनोद मेहरा यांच्या अचानक निधनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला होता. मेहरा यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले तेव्हा ते केवळ 45 वर्षांचे होते. मेहरा यांनी आपल्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे 100 चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. 

▪️ किशोर कुमार : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि गायक किशोर कुमार यांनी अनेक वर्षे बॉलिवूडवर राज्य केले. पण 13 ऑक्‍टोबर 1987 रोजी या कलाकाराने अचानक जगाचा निरोप घेतला. किशोर कुमार यांनी 13 ऑक्‍टोबर रोजी वयाच्या 58 व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला.