Take a fresh look at your lifestyle.

सचिन तेंडूलकरचे ‘हे’ रेकॉर्ड तोडणे अशक्यच!

'या' रेकॉर्डवर एक नजर टाकूयात.

 

मुंबई : क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन अनेक वर्षे उलटली तरीही त्याने केलेले अनेक रेकॉर्ड आजही जसेच्या तसे आहेत. ज्यांना मोडणे जवळपास अशक्य आहे. आज आपण त्यावर एक नजर टाकूयात…
● सचिनने आपल्या 24 वर्षांच्या कारकीर्दीत 200 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने तर 463 एकदिवसीय खेळले.

● सचिन एकूण 6 वेळा वर्ल्ड कप खेळला असून हा विक्रम मोडणे कठीण आहे.
● टेस्ट क्रिकेटमध्ये सचिनने 51 तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकं झळकावली आहेत. सचिन हा शंभर शतकांचा रेकॉर्ड मोडणे अवघड आहे.
● सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. यापेक्षा अधिक धावा करणे सध्या तरी कठीण वाटतेय.
● सचिनने खेळल्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 9 वेळा सामनावीराचा किताब पटकावला आहे. हा एक वेगळा रेकॉर्ड सचिनच्या नावे आहे.

● सचिनने 14 व्या वर्षी रणजी खेळायला सुरुवात केली. यामुळे रणजीमध्ये खेळणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे.
● एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 1,894 धावा करण्याचा विक्रम देखील सचिनच्या नावावर आहे. जो आजपर्यंत कायम आहे.
● 20 व्या अगोदर तब्बल 5 कसोटी शतके करणारा तो एकमेव खेळाडू असून हा एक जागतिक विक्रम आहे.
● जगातील तब्बल 90 वेगवेगळ्या मैदानांवर क्रिकेट खेळण्याचा त्याचा विक्रम कोणालाच जमलेला नाही

● विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 2,278 धावा करण्याचा विक्रम देखील सचिनच्याच नावावर कायम आहे.
● सचिन असा खेळाडू आहे ज्याला टीम हरल्यानंतर देखील 6 वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळालेला आहे.