Take a fresh look at your lifestyle.

रात्रभर मोबाईल चार्जिंग सुरू ठेवलं तर काय होतं? 

बॅटरीचा स्फोट होवू शकतो का ? वाचा !

 

हल्ली मोबाईल शिवाय कोणाचं पान हालत नाही, अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे मोबाईल वापरताना अन्य अ‍ॅक्सेसरिजचा काळजी घेणे गरजेचे आहे.

अनेकदा दिवसभर मोबाईल वापरून झाली कि, रात्रीच्या वेळी तो चार्जिंगला लावून लोक झोपतात. त्यामुळे रात्रभर मोबाइल चार्जिंगला राहतो. काही लोक तर दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा मोबाईल चार्जिंग करत असतात.

मात्र मोबाईल नेमका कधी? किती वेळ चार्ज करावा? रात्रभर मोबाईल चार्ज केल्यानं त्यातल्या बॅटरीवर परिणाम होतो? बॅटरी लवकर खराब होते का? बॅटरीचा स्फोट होऊ शकतो का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत…

अलीकडच्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये एक खास यंत्रणा सक्रिय असते. ज्यामुळे फोन फुल चार्ज झाल्यावर बॅटरीला होणारा वीजपुरवठा बंद होतो. मात्र असे असले तरी युझर्सनी दररोज रात्रभर मोबाइल चार्जिंगला लावू नये, असे जाणकार सांगतात.

जर चार्जिंग पूर्ण झाली आणि तरी चार्जिंग सुरूच ठेवली तर मोबाईल फोनमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. परंतु, अलीकडच्या स्मार्टफोनमध्ये असं होण्याची शक्यता जवळपास नाही. चार्जिंगच्या वेळी मोबाईल गरम झाला तर काही लोकं घाबरतात. परंतु, अशी भिती बाळगण्याची गरज नाही.

जाणकारांच्या मते, लिथियम आयन बॅटरीत चार्जिंगदरम्यान रासायनिक क्रिया होतात. बॅटरीतल्या पॉझिटिव्ह (+) चेंबरमधले आयन निगेटिव्ह (-) चेंबरकडे प्रवाहित होत असतात. त्यामुळे बॅटरी गरम होते. हे साहजिक आहे. यात भीतीचं काहीच कारण नाही.

सध्याच्या स्मार्टफोनमध्ये चार्जिंग सर्किट बसवण्यात आल्याने बॅटरी 100 टक्के चार्ज होते तेव्हा वीजपुरवठा घेणं बंद करते. बहुतांश स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसरअसतो. हा प्रोसेसर स्मार्ट असतो. बॅटरी चार्ज झाल्यावर हा प्रोसेसर चार्जिंग बंद करतो. बॅटरी जेव्हा 90 टक्क्यांवर येते तेव्हा पुन्हा चार्जिंग सुरू होतं. त्यामुळे एखाद्या दिवशी रात्रभर चुकून स्मार्टफोन चार्जिंगला तसाच राहिला तरी काळजी करू नका. परंतु, रात्रभर मोबाईल चार्जिंग सुरू न ठेवणं अधिक श्रेयस्कर आहे.