मध्यप्रदेश : ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेली अमेझॉन कंपनीद्वारे चक्क गांजाच्या तस्करी करण्यात आली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशात उघडकीस आला आहे. डिजिटलायझेशनचा गुन्हेगार अशा पद्धतीनेही गैरवापरही करत असल्याचे वारंवार समोर येत आहे
कढीपत्त्याच्या नावाने गांजा विक्रीकल्लूने विशाखापट्टणम येथे बनावट पॅन क्रमांक आणि जीएसटी क्रमांकासह ऑनलाइन ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर कढीपत्ता विकण्यासाठी आपल्या फर्मची नोंदणी केली होती. याद्वारे ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि देशाच्या इतर भागांत कढीपत्त्याच्या नावाने गांजा आयात केला जात होता. या व्यवसायात ब्रिजेंद्र हा कल्लूला मदत करायचा. कल्लूने आतापर्यंत एक टन गांजा विकून एक कोटी दहा लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. कल्लूने आपली कंपनी बनावट पॅन नंबर आणि जीएसटी नंबरद्वारे कंपनी चालवली आणि या व्यवसायात ई-कॉमर्स कंपनीला 66.66 टक्के नफाही मिळाला, अशी माहिती एसपी मनोज कुमार सिंह यांनी दिली.
आरोपींकडून 20 किलो अमली पदार्थ जप्तदरम्यान, आरोपी एका आघाडीच्या ई-कॉमर्स कंपनीच्या माध्यमातून त्यांची टोळी चालवत होते आणि या कंपनीला दोन तृतीयांश नफाही मिळत होता. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ई-कॉमर्स कंपनीवर अशा अंमली पदार्थांच्या व्यापारासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल कारवाई केली जाऊ शकते का, याबाबत तपास सुरु असल्याचे मनोज कुमार यांनी सांगितले.
मध्य प्रदेशातील भिंडमध्ये पोलिसांनी ऑनलाइन गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून टोळीच्या दोन सदस्यांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 20 किलो अमली पदार्थ जप्त केला आहे. भिंडचे पोलीस अधीक्षक (एसपी) मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यावर कल्लू पवैया (30) आणि ढाबा मालक ब्रिजेंद्र तोमर (35) यांना भिंडमधील ग्वाल्हेर रोड येथून अटक करण्यात आली. आरोपींकडून 20 किलो गांजा जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.