Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸22 नोव्हेंबर 2021 

 

▪️मेष : जोडीदाराशी उगाच वाद घालू नका. भागीदारीत सबुरीने वागावे. भावंडांचे प्रश्न सोडवाल. रागावर नियंत्रण ठेवा.
▪️वृषभ : चारचौघात कौतुक होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. अचानक धनलाभाची शक्यता. जास्त विचार करत बसू नका.
▪️मिथुन : जोडीदाराची साथ उत्तम लाभेल. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. क्षुल्लक कारणावरून चिडू नका. एकाच गोष्टीवर ठाम राहावे.
▪️कर्क : कौटुंबिक वातावरण प्रसन्न ठेवा. सर्वांना आपलेसे करून घ्याल. क्षुल्लक मतभेदात अडकू नका. सतत गुंतून राहाल.
▪️सिंह : कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. भावंडे तुमच्याविषयी तक्रार करू शकतात. स्वत:चा आब राखून वागाल. तुमच्याबाबत गैरसमज पसरू शकतो.
▪️कन्या : अतितिखट पदार्थ खाणे टाळावे. अपशब्द टाळण्याचा प्रयत्न करावा. हातात काही नवीन जोखमीची कामे येतील. भावंडांचे सहकार्य लाभेल.
▪️तूळ : काही जुने प्रश्न सामोरे येतील. घरगुती ताण आटोक्यात ठेवावा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.
▪️वृश्चिक : मनासारखी विश्रांती मिळणार नाही. एकाच गोष्टीवर अडून राहू नका. कर्ज प्रकरणे वेळेवर हाताळा.स्वत:चेच खरे कराल.

▪️धनू : प्रत्येक गोष्टीकडे आनंदी नजरेने पहाल. सौंदर्यवादी दृष्टिकोन बाळगाल. आवडीचे पदार्थ चाखाल. कामे मनाजोगी पार पडतील. झोपेची तक्रार जाणवेल.
▪️मकर : मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे. पैज जिंकता येईल. कामातील बदल जाणून घ्या. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
▪️कुंभ : मित्रांच्या सहवासात रमाल. आवडती वस्तू खरेदी कराल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. जुनी कोर्टाची कामे निघू शकतात.
▪️मीन : किरकोळ दुखापत होण्याची शक्यता. अति अपेक्षा बाळगू नका. प्रवासाचा योग संभवतो. शारीरिक कष्ट अधिक संभवतात.