Take a fresh look at your lifestyle.

ज्यांनी एअर इंडिया विकली त्यांना एस.टी.वर बोलण्याचा अधिकारच काय ? बाळासाहेब थोरात

 

मुंबई : एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपावर भाष्य करीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ते खामगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.भाजप एसटी कर्मचाऱ्यांचा संप पेटवण्याचा प्रयत्न करत आहे हे उघड आहे. खरं म्हणजे ज्यांनी एअर इंडिया विकली, रेल्वे विकतायत, त्यांना आता एसटीवर बोलण्याचा अधिकार नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
एसटी कामगारांच्या हिताची जपणूक महाविकास आघाडीने आत्तापर्यंत केलेली आहे. अजूनही परिवहन मंत्री त्यांच्याशी चर्चा करत आहेत. लवकरच मार्ग निघेल. आमचीही परिवहन मंत्र्यांशी चर्चा चालू आहे, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.थोरातांनी केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने केलेले ही तीनही कृषी कायदे शेतकरी विरोधी होते. हे कायदे रद्द करण्याची मागणी अनेकदा शेतकऱ्यांनी केली. मात्र कायदे रद्द होत नसल्याचे दिसताच या कायद्यांविरोधात शेतकरी एकवटले आणि दिल्लीमध्ये तब्बल एक वर्ष आंदोलन चालले. याकाळात अनेकदा आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न भाजपने केला, मात्र त्यांना यश आले नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.अखेर सरकार झुकले शेतकऱ्यांचा विजय झाला आणि कायदे मागे घेण्याची घोषणा करण्यात आली.

या काळात काँग्रेस शेतकऱ्यांच्यासोबत होती आणि यापूढेही असेल, असेही त्यांनी म्हटले.दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केल्यानंतर, विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे.पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तसेच येत्या काळात अनेक राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. भाजपाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतला असल्याची टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात येत आहे.भाजपने कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली, याचा आम्हाला आनंद झाला, मात्र कायदे रद्द करण्यासाठी आता अधिवेशनाची वाट न पहाता ते तातडीने रद्द करावेत अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.