Take a fresh look at your lifestyle.

…म्हणून झाडांवर पांढर्‍या-लाल रंगाचे पट्टे असतात!

 

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांच्या मुळांवर पांढरे आणि लाल रंगाचे पट्टे तुम्ही अनेकदा पहिले असतील. मात्र असे का केले असेल? याचा विचार तुम्ही केला नसेल. चला, तर आज याबाबत जाणून घेऊयात…
झाडांच्या तळाशी पांढरे आणि लाल रंगाचे पट्टे रंगवण्याची पद्धत जुनीच आहे. असे करण्यामागील हेतू म्हणजे हिरव्यागार झाडांना अधिक शक्ती देणे. अनेकदा झाडांमध्ये क्रॅक येतात आणि त्यांची साल बाहेर पडाते, त्यामुळे झाडे कमकुवत होतात. म्हणूनच त्यांना रंगविले गेले आहे, जेणेकरून त्यांची शक्ती कायम राहील.
झाडे रंगवण्यामागचा दुसरा हेतू म्हणजे यामुळे वाळवी किंवा किडे लागत नाहीत. कारण कोणतेही कीटक झाड पोकळ करतात, परंतु पेंटिंगमुळे झाडांना किडे चहोत नाहीत
झाडांना रंग दिल्याने त्यांची सुरक्षाही होते. कारण वनविभागाच्या नजरेत ही झाडे असून त्याची कापणी करता येत नाही, असे देखील यामागे संकेत आहेत.
राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कडेला असणारी झाडे देखील पांढर्‍या रंगात रंगविली जातात. जेणेकरून ती रात्रीच्या अंधारात सहज दिसतील.