Take a fresh look at your lifestyle.

दुर्मिळ शार्क सापडला, तोंड पाहून लोक हैराण!

या माशाचे फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल.

 

इटलीतील एका शार्क माशाच्या फोटोने सगळेच हैराण झाले आहेत. येथील एल्बा आयलॅंडच्या पाण्यात एका व्यक्तीला डुकरासारखं तोंड असलेला शार्क सापडला. सध्या या माशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एका माहितीनुसार, समुद्रात नेव्ही ऑफिसर्स मासे पकडण्यासाठी गेले होते. मग त्यांनी पाण्यात जाळं फेकलं तर एक दुर्मीळ मासा अडकला. या शार्कचं नाव एंग्युलर रफशार्क आहे. ज्याला Pig Faced Shark असंही म्हटलं जातं.

हे रफशार्क समुद्रात साधारण २,३०० फूट खोल पाण्यात आढळतात. लोक या शार्कला प्रथमच पाहत असल्याने अनेकांना धक्काच बसला. शार्कची ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर असून याला IUCN ने इंडेजंर्डच्या कॅटेगरीत सामिल केलं आहे.