आईच मुलीची पहिली मैत्रीण आणि गुरु असते. मात्र विशेषत: तारुण्याच्या काळात दोघींमध्ये अनेकदा मतभेद पहायला मिळतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या प्रत्येक आईने आपल्या मुलीला सांगणे, शिकवणे गरजेचे आहे…
● शाळेनंतर मुलगी जेव्हा महाविद्यालयात जाते तेव्हा तिच्यासाठी अनेक गोष्टी बदलतात. महाविद्यालयात तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या दरम्यान आईने मुलीला जबाबदार आणि सामर्थ्यवान कसे व्हायचे? याबाबतचे धडे शिकवायला हवे.
● मुलींसोबत संबंध घट्ट राहावेत यासाठी आईने तिच्यासोबत मैत्री करायला हवी. तसेच, तिला कॉलेजमध्येही चांगले मित्र बनवण्याबद्दल सांगायला हवे. कारण आयुष्यात चांगले मित्र तुम्हाला योग्य मार्गावर जाण्यास मदत करतात.
● आईने आपल्या मुलीला समजावून सांगायला हवे की, प्रत्येक माणूस त्याच्या अनुभवांमधून शिकतो. कोणत्याही परिस्थितीत किंवा कामात अपयश आले तर घाबरून चालणार नाही. अपयशातून शिकणे आवश्यक आहे.
● कॉलेजमध्ये नवीन मित्र भेटतात, त्यातील कधी सोडून जातात. पुन्हा नवीन मित्र भेटतात. ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. याचे दुःख करत बसू नका. अशा परिस्थिती कशी हाताळायची? त्यातून कसे बाहेर पडायचे? ते मुलीला शिकवा.