Take a fresh look at your lifestyle.

महेंद्रसिंह धोनी आयपीएल खेळणार का ?

चेन्नई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएलचे पुढचे सिझन खेळणार का ? असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. या प्रश्नाचे उत्तर खुद्द धोनीनेच दिले आहे. आयपीएलचे पुढचे सिझन अजून लांब आहे. पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये हे सामने होतील. त्यामुळे मी त्याच्यावर विचार करेल, असं माहीने सांगितलंय. धोनी चेन्नईमध्ये एका कार्यक्रमात बोलत होता.
आयपीएल 2021 नुकताच संपला आहे. या सिझनमध्ये महेंद्रसिंह धोनीने धमाकेदार कामगिरी केली. आता मात्र प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे. धोनी आयपीएल 2022 मध्ये खेळणार की नाही? असे विचारले जात आहे. सध्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणजेच धोनीने याचे उत्तर दिलेय. चेन्नई येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना आता नोव्हेंबर महिना आहे आणि आयपीएल 2022 एप्रिलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे मी विचार करेल. सध्या त्याला घाई नाही, असे धोनी यांनी माध्यमांना सांगितलंय.
आयपीनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2021 चे विजेतेपद पटकावले. चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत आयपीएलच्या चार ट्रॉफीज जिंकलेल्या आहेत. आयपीएल 2021 जिंकल्यानंतरदेखील 2022 च्या आयपीएल सिझनमध्ये खेळणार का ? असा सवाल धोनीला करण्यात आला होता. यावेळीदेखील त्याने मी कोणताही वारसा सोडलेला नाही. असं सांगितलं होतं. त्यानंतर धोनी आयपीएलचे पुढचे सिझन खेळणार आहे, असा अंदाज बांधला जात होता.
आयपीएल 2021 सिझन चेन्नईने जिंकले. ट्रॉफी खिशात घातल्याननंतर धोनीने “सीएसकेसाठी काय चांगले असेल त्यावर आम्ही निर्णय घेऊ. आम्हाला एक मजबूत संघ बनवयचा आहे. फ्रँचायझीसाठी काय चांगले आहे, काय नाही, यावर आम्ही विचार करु. तसेच आम्हाला आता पुढील 10 वर्षे चांगला खेळ खेळणारी टीम तयार करायची आहे,” असे धोनीला सांगितले होते. तसेच तुम्ही जो वारसा सोडत आहात त्याचा अभिमान आहे का, असे विचारल्यानंतर मी सध्या माझा वारसा सोडलेला नाही, असे उत्तर धोनीने दिले होते.
दरम्यान, आयपीएलच्या पुढील हंगामात म्हणजेच आयपीएल 2022 मध्ये बरेच बदल होणार आहेत. या सिझनमध्ये प्रथमच 8 ऐवजी 10 संघ खेळताना दिसतील. आयपीएल 2022 पासून अहमदाबाद आणि लखनौ असे दोन नवे संघ खेळताना दिसतील.