Take a fresh look at your lifestyle.

आमदार निलेश लंके वाढदिवसाच्या निमित्ताने करणार १०१ विवाहाचे कन्यादान !

पारनेर :राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या १० मार्च रोजी वाढदिवस असून या वाढदिवसाच्या निमित्ताने १०१ विवाहाचे कन्यादान या दिवशी ते करणार आहे. या विवाहासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित दादा पवार खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असून आमदार लंके यांच्या बरोबर हे पवार कुटुंबीय कन्यादान करणार असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके प्रतिष्ठान च्या वतीने हा सामुदायिक विवाहाचे आयोजन केले जात असून अवघ्या १ रुपयात हा विवाह करण्यात येणार आहे तर या सामुदायिक विवाहात सामिल होणाऱ्या‌ जोडप्यांना संसारपयोगी साहित्यासह शाही विवाह सोहळा यावेळी आयोजित केला जाणार आहे. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात अनेक गोरगरीब गरजू शेतकरी व पालकांच्या पुढे मुला-मुलींच्या विवाहप्रसंगी आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे या कुटुंबियांना पर्याय म्हणून अवघ्या एक रुपयात आमदार निलेश लंके यांनी तालुक्यात सामुदायिक विवाह सोहळा आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केला आहे. पारनेर येथील बाजार समितीच्या आवारात जवळ असणाऱ्या एका प्रांगणात हा विवाह सोहळा आयोजित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसा निमित्ताने १० मार्च रोजी पारनेर येथे १०१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जाणार असून या जोडप्याला महाराष्ट्र राज्यातील अनेक मंत्री हजेरी लावणार असल्याची माहिती आमदार यांनी दिली आहे. कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी व इतर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हा सामाजिक उपक्रम आमदार निलेश लंके यांनी राबवला असून अनेक गोरगरीब व गरजूंना यामुळे निश्चित आधार मिळणार आहे.

आ.लंके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस व निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने १०१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह पार पडणार आहे. त्यामुळे या जोडप्यांना संसारपयोगी वस्तू सह मिष्ठान्न भोजन व सनई पासून डीजे पर्यंत संगीत वाद्य या सामुदायिक विवाह सोहळ्यात दिसणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्यासह पवार कुटुंबातील सदस्य कन्यादान करणार आहेत.