Take a fresh look at your lifestyle.

अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यावर पडला लाईक्सचा पाऊस !

मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. कालच अमृता फडणवीस यांनी ‘आओ कुछ तुफानी करते है’ असे सुचक ट्विट केले होते. अमृता फडणवीसांच्या ट्विटनंतर काही तरी नवीन पहायला मिळणार हे निश्चित होते आणि अमृता फडणवीसांचं ते तुफानी गाणं प्रदर्शित झाले आहे.
अमृता फडणवीसांच्या फेसबुक वॉलवरुन त्यांचे नवे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांना शानदार गिफ्ट दिले आहे. गाण प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
राज्यात आणि देशात ‘सध्या सुरू असलेल्या तापदायक राजकीय वातावरणात या कूल गाण्याने थोडं चिल पील घ्या,’ असं कॅप्शन देत अमृता यांनी हे गाणं शेअर केलं आहे. तर योहानीने 22 मे रोजी मनिके मागे हिते गाणं शेअर केलं होतं. श्रीलंकेसह भारतातही या गाण्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तर याच गाण्यातून प्रेरणा घेत अमृता फडणवीस यांनी या गाण्याचा रिमेक केला आहे. या रिमेक गाण्यात अमृता फडणवीस हटके लूकमध्ये दिसत आहेत.