Take a fresh look at your lifestyle.

शिवसैनिकांना त्रास दिल्यास हात धुवून मागे लागणार !

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचा इशारा.

पारनेर : राज्याचे राजकारण सध्या एका वेगळ्याच वळणावर सुरू आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय पुढे नेण्याचे काम आपण करणार आहोत.महसुल‌,पोलिस किंवा इतर कार्यालयात अधिकारी जर शिवसैनिकांना त्रास देत असेल तर आपण त्यांच्या हात धुवून मागे लागणार असल्याचा इशारा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिला ‌‌आहे.
तालुका शिवसेनेच्या वतीने पारनेर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना. गडाख बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे,संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर सभापती काशीनाथ दाते,सभापती गणेश शेळके,उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले,पंचायत समिती सदस्य श्रीकांत पठारे, युवा नेते अनिकेत औटी, तालुकाप्रमुख विकास रोहोकले,युवा सेना प्रमुख नितीन शेळके,शिवाजी बेलकर बाबासाहेब तांबे, शहरप्रमुख निलेश खोडदे,शंकर नगरे पैलवान युवराज पठारे दत्तात्रय कुलट बंडुनाना सप्रे,ताराबाई चौधरी,संतोष येवले,सरपंच राजेश भनगडे,पोपट चौधरी,विकास सावंत,महिला आघाडी प्रमुख डॉ वर्षा पुजारी प्रियंका खिलारी,सरपंच लीलाबाई रोहोकले यांच्या शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी जलसंधारण मंत्री गडाख म्हणाले की,विजय औटी यांनी गोड बोलून माझ्यापुढे बऱ्याच अडचणी केल्या आहेत परंतु माजी आमदार औटी पुन्हा एकदा नव्या जोमाने सक्रिय झाले आहेत.एवढा विकास कामे‌ करून पराभव का झाला याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आता कार्यकर्त्यांना आहे.आपण व कार्यकर्ते कमी पडलो याचे‌ आत्मचिंतन होणे गरजेचे आहे.पराभव झाल्यानंतर प्रचंड त्रास झाला.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री ‌होण्यात रस नव्हता.राज्यात महाआघाडी सरकार असून‌ अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे दोन‌ वर्षापुर्वी मी निवडणुकीत निवडून आलो तर तुमच्या बरोबर ‌‌ येईल असा शब्द दिला होता ‌‌तो‌ पाळला असल्याचे नामदार गडाख यांनी सांगितले आहे.
माजी आमदार विजयराव औटी म्हणाले की दोन वर्षाच्या कार्यकाळात मी बाहेर पडलो नाही. नवीन माणसाला संधी दिली ते संधीचे सोने करायला निघाला की लोखंड हे‌ पाहिले मग मी मैदानात उतरलो‌.राजकारणात अपरिहार्यता नेत्याला टोकाचे निर्णय घ्यायला लागतात.तर दुसरीकडे के.के.रेंजप्रश्नी मी तीन वेळा संरक्षण मंत्री यांच्या बरोबर बैठक केली आहे त्यामुळे कुणीतरी दिशाभूल व वेड्यात काढण्याचे काम करत आहेत.जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दोन संचालक दिले असून शिवसेनेला संधी दिली नसल्याचे औटी यांनी सांगितले.

आमचे तालुक्यात आम्ही सोयीचे राजकारण करणार भलेही तलवार हातात घ्यावी लागेल‌ तरी चालेल असेही माजी आमदार विजयराव औटी यांनी सांगितले आहे.संघर्ष भयानक झाला असून मतदार संघ वाचविण्यासाठी रक्ताचे पाणी केले आहे.राजकारणात उलथापालथ चालू असते परंतु या सर्व सामान्य जनतेसाठी रक्ताचा थेंब असे पर्यंत काम करणार असल्याचे विजयराव औटी यांनी सांगितले आहे.
गृहमंत्रीच तुरुंगात ‌‌गेले म्हटल्यावर तोंड दाखवायला जागा नाही.त्यामुळे सामान्य जनतेच्या पाठीशी नामदार गडाख उभे राहिले तर चांगले चित्र उभे राहिल. वीजपुरवठा बाबत तक्रारी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पालकमंत्री पद हे शंकरराव गडाख यांना देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे करणार आहे.

संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर म्हणाले की पारनेर तालुक्यातील शिवसैनिकाला आधार देण्यासाठी जलसंपदा मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी पारनेर तालुका दत्तक घ्यावे असे आवाहन केले आहे तर दुसरीकडे जिल्हाध्यक्ष प्रा.शशिकांत गाडे यांनी पारनेर मध्ये लक्ष देणे गरजेचे आहे.शिवसेनेबरोबर आजच्या कार्यक्रमाला झालेली गर्दी ही विजय औटी ही खरी ताकद आहे.विजय औटी हे शिस्तीचा माणूस हा खरा माणुस असल्याचे भाऊ कोरेगावकर म्हणाले.त्यामुळे पारनेरच्या शिवसेना नेत्यांमध्ये लढण्याची ताकद असताना या ताकदीच्या जोरावर यापुढील काळात लढाई करावी असे आवाहन केले आहे.त्यामुळे समोर जमलेली ही गर्दी शिवसैनिकांच्या मनामनात असलेली खदखद आहे असे‌ संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर म्हणाले.