Take a fresh look at your lifestyle.

दीड दिवसांनी गणेश मूर्तीचं विसर्जनाची प्रथा कशी सुरु झाली? 

जाणून घेवू या, या मागील परंपरा.

 

लाडक्या बाप्पाचं काल थाटात आगमन झालं. बऱ्याच ठिकाणी ११ दिवस गणेशोत्सवाची धूम असते. मात्र अनेक घरगुती गणपती मात्र दीड दिवसांचेच असतात.

दीड दिवसांनी बाप्पाचं विसर्जन करण्याची अनेक कारणं असली तरी विसर्जन करण्यामागची परंपरा काही वेगळीच आहे. त्याबाबत जाणून घेऊयात…

प्रसिद्ध अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी याबाबत सांगितले होते. आपल्याकडे भाद्रपद महिन्यात जवळपास चतुर्थीच्यादरम्यान धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पात्यातून डोलायला लागतात. यावेळी धरणीमातेचे आभार मानले जातात.

धरणी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करता यावा याठी त्यावेळी बांधावरच मातीची मूर्ती तयार करून पूजा केली जात. यानंतर त्याचदिवशी मूर्तीचं नदीत विसर्जन केलं जातं. कालांतराने या परंपरेत बदल होऊ लागला. लोकं सुबक मातीची मूर्ती तयार करून घरी आणू लागले.

तिची प्राणप्रतिष्ठापना करून नंतर मग मूर्तीचं विसर्जन करू लागले आणि हळू-हळू दीड दिवस गणपती पूजनचा पायंडा पडू लागला. असे असले तरी अनेक ठिकाणी चतुर्थीच्याच दिवशी मूर्तीपूजा करून विसर्जन करण्याची प्रथा कायम आहे.