Take a fresh look at your lifestyle.

भारतातील सर्वाधिक बुद्धिमान माणसं कोण?

एकदा नक्की पहाच...

भारतातील सर्वाधिक बुद्धिमान लोक कोण आहे? याबद्दल अनेक मतांतर असतील. तरीही आपण अशाच काही दिग्गज लोकांची माहिती पाहणार आहोत, ज्याची बुद्धिप्रतिभा पाहून सर्जन अवाक झाले होते…   
● श्रीनिवास रामानुजन : प्रसिद्ध गणितज्ञ रामानुजन यांनी 13 वर्षांचे असताना त्रिकोणमितीचे गणित सोडवले होते. तर वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी जगाला गणिताची अनेक सूत्र आणि सिद्धांत दिले. त्यांनी केलेल्या कार्याची दाखल घेऊन त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो.
● डॉ. भीमराव आंबेडकर : भारतरत्नने सन्मानित बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेच्या विरोधात काम केले. कायदा तज्ज्ञ आणि बहुजन राजकीय नेते म्हणून बाबासाहेबांचे योगदान न विसरण्याजोगे आहे. त्यामुळेच त्यांना भारताच्या आधुनिक काळातील मनु म्हणून संबोधले जाते. त्यांनी भारतीय सामाजिक संरचना आणि वर्णव्यवस्थेत क्रांतिकारक बदल केला.
● एपीजे अब्दुल कलाम : ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळख असणारे अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती, जगातील नामांकित वैज्ञानिक आणि अभियंता होते. त्यांनी जगात भारताचा डंका वाजवला, तरुणांसाठी अनेक प्रेरणादायक गोष्टी दिल्या. त्यांची शिकवण आजही अंगिकारण्याच्या प्रयत्न केला जातो. यातून त्यांची बुद्धिप्रतिभा दिसून येते.
● रजनीकांत : दिग्गज अभिनेते रजनीकांत आपल्या वेगवान बुद्धिमत्तेसाठी ओळखले जातात. ते दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे अनभिक्षीत सम्राट आहेत. प्रेक्षकांची गर्दी खेचून आणणारे, आपल्या संवादफेकीबद्दल प्रसिद्ध आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीसाठी प्रसिद्ध असल्याने लोक त्यांना देवाचा दर्जा देतात.
● मुकेश अंबानी : देश तसेच आशियातील सर्वात श्रीमंत माणसांपैकी एक असणाऱ्या मुकेश यांच्या बुद्धिमत्तेचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. अनेक क्रांतिकारी निर्णय घेणारे अंबानी यांनी जिओ मार्केटमध्ये आणून इतिहास रचला. आज त्यांच्या बुद्धिमत्तेचे गोडवे गातात.
● महेंद्रसिंग धोनी : धोनीच्या कल्पक नेतृत्वाखाली भारताने टी-20 वर्ल्डकप, 2011 एकदिवसीय वर्ल्डकप तसेच आयसीसीच्या सर्व महत्वाच्या ट्रॉफी जिंकल्या. त्यामुळेच तो भारताच्या सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानला जातो. धोनी त्याच्या वेगवान निर्णय क्षमतेसाठी ओळखला जातो. त्याच्या धाडसी निर्णयामुळे भारतीय क्रिकेटचे भविष्य पालटले. त्याच्या अविस्मरणीय कामगिरीमुळे त्याला पद्मभूषण, पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले.