Take a fresh look at your lifestyle.

देशाची संस्कृती जपण्यासाठी संस्कार गरजेचे!

गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांचे प्रतिपादन.

पारनेर :भारत देशाची संस्कृती ही जगाला आदर्श देणारी असून या देशाची संस्कृती जपण्यासाठी अध्यात्म व देश संस्कार गरजेचे असल्याचे मत गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांनी व्यक्त केले आहे.
तालुक्यातील पानोली येथे स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक मंडळ दिंडोरी प्रणित अध्यात्म व शेतकरी सुसंवाद मेळाव्याचे आयोजन रामाशेठ गाडेकर यांच्या मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आ.निलेश लंके उपस्थित होते.
आमच्या या अध्यात्म मंडळात जात, धर्म, गरीब श्रीमंत असा भेदभाव या अध्यात्मिक मार्गात पाळला जात नसल्याचे गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांनी सांगितले आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र विकास मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, उद्योजक सुरेश पठारे, सरपंच ‌‌शिवाजी शिंदे, विश्वनाथ कोरडे ,माजी सरपंच जयसिंग मापारी, उद्योजक सुरेश धुरपते, डॉ. रामचंद्र थोरात, जितेश सरडे, बबनबुवा जोजार यांच्या सह ग्रामस्थ व भक्तगण उपस्थित होते.
मानवाला दुःख मुक्त व ज्ञानी बनविण्यासाठी अंतःकरणावर पण संस्कार गरजेचे असल्याचे मत गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांनी सांगितले आहे.त्यामुळे या विभागातुन १८ विभाग चालविले जात असून २० टक्के अध्यात्म व ८० टक्के समाजकारण चालविण्यासाठी काम आहे.त्यामुळे अध्यात्म काम करत असताना डोळस श्रद्धा ठेवून काम केले पाहिजे.त्यामुळे आमच्या या अध्यात्म कुटुंबात काम करणाऱ्यांसाठी नियमावली बनविण्यात आली असून जीवनात शिस्त व नियम आवश्यक असल्याचे मत गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांनी व्यक्त केले आहे.त्याचबरोबर सेंद्रिय शेती आरोग्य भारतीय सण संस्कृती पर्यावरण आदि विषयावर मौलिक विचार केले आहे.
या अध्यात्म व शेती पर्यावरण विषयक विभागाच्या वतीने १८ स्टाॅल लावण्यात आले होते‌.तसेच प.पु .मोरे दादा यांच्या नावाने असाध्य आजारांवर जे औषधे व उपचार यासाठी १ हजार बेडचे रुग्णालयात उभारण्यासाठी पुढाकार घेतला जाणार असल्याचे सांगितले.त्यामुळे याचा फायदा गोरगरीब व गरजु आदिवासी रूग्णांना होईल अशी माहिती गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांनी दिली आहे.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पारनेर तालुक्यातील सर्व सेवेकऱ्यांनी योगदान दिले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामराव गाडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन विरेंद्र परदेशी, काशिनाथ फंड यांनी तर विनोद उदार यांनी आभार मानले.