Take a fresh look at your lifestyle.

डॉक्टर म्हणजे ईश्वराने पाठविलेले दूतच !

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मत.

राळेगणसिद्धी : डॉक्टर म्हणजे ईश्वराने पाठविलेले दूतच आहेत. ईश्वरची पूजा करत असतानाच आपलं गाव हे एक मंदिर माना, जनता ही सर्वेश्वर मानून जनतेची सेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा आहे. समाजातील रंजल्या गांजल्यांची सेवा हीच खरी सेवा असल्याचे असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक डॉ. अण्णासाहेब हजारे यांनी मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या १९ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राळेगणसिद्धी येथे केले. याप्रकारची शिबिरे मोठ्या प्रमाणात यापुढे होणे ही काळाची गरज आहे.
शिबिरात दिवसभरात ४५० हुन अधिक रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली तर जवळपास ८० जणांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरासाठी पुणे येथील मोरया रक्तपेढीचे सहकार्य लाभले.
यावेळी आमदार निलेश लंके, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख,सभापती गणेश शेळके, सभापती प्रशांत गायकवाड, आयुक्त डॉ. गणेश पोटे, सरपंच डॉ. धनंजय पोटे,सरपंच लाभेष औटी, माजी सरपंच जयसिंग मापारी, उद्योजक सुरेश पठारे, व्हा. चेअरमन दादा पठारे, युवराज पठारे, शरद मापारी, सुभाष पठारे, सुनिल हजारे, डॉ. पोपट सोनवणे, डॉ. प्रकाश लाळगे, डॉ. सुदाम बागल यांच्यासह आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकारांच्या प्रमुख उपस्थितीत नेत्र व रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला.
यावेळी डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, राळेगणसिद्धी सारख्या ग्रामीण भागात हे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मात्र येथे मिळणारा प्रतिसाद हा अभूतपूर्व असा आहे. शिबिरात आलेल्या प्रत्येक रुग्णावर उपचार केले जातील. ज्यांच्यावर पुढील उपचार अथवा शस्रक्रिया आवश्यक आहे, त्यांच्यावर मुंबई येथे जे जे हॉस्पिटल येथे मोफत शस्रक्रिया केल्या जातील. त्यामुळे हे शिबिर फक्त आजच्या दिवसापुरते मर्यादित नसून येथे नोंदणी केलेल्या प्रत्येक रुग्णाला उपचार मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जाईल आणि सर्व उपचार मोफत करण्यात येतील असे ते म्हणाले.
या शिबिरासाठी श्यामराव पठाडे, संदिप पठारे, रुपेश फटांगडे, महेश गाजरे, महेंद्र गायकवाड, सुनिल जाधव, रुपेश पठारे, अमोल मापारी, सागर पठारे, करण पठारे, शाम केदारे, अक्षय पठारे, विजय पठारे, अशोक पठारे, सदाशिव पठारे, प्रविण फटांगडे, भाऊ पोटघन, सागर हजारे, रोहिदास पठारे आदींनी शिबिरासाठी मोठे परिश्रम घेत शिबिर यशस्वी केले.