Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸20 नोव्हेंबर 2021  

▪️मेष : विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे. परिचितांना मदत कराल. कोणाला शब्द देताना विचार करावा. आवश्यक कामे यथायोग्य पार पडतील. 
▪️वृषभ : भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. आहारावर नियंत्रण ठेवावे. नवीन लोक संपर्कात येतील.व्यावसायिक उन्नती साधता येईल.
▪️मिथुन : मनातील इच्छा पूर्ण होईल. बुद्धी चातुर्याचा वापर कराल. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
▪️कर्क : दिवस माध्यम फलदायी असेल. जमाखर्चाचा ताळमेळ ठेवावा. भावनांना आवर घालावा. विलंबित गोष्टी मार्गी लागतील.
▪️सिंह : घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. व्यवसायात चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो. संयमाने परिस्थिती हाताळा.जुनी उधारी वसूल होईल.
▪️कन्या : विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील. बचतीच्या योजना आखाव्यात. अधिकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल.घरासाठी मोठी खरेदी कराल.
▪️तूळ : आपल्या निर्णयावर ठाम राहा. समोरील गोष्टीत आनंद माना. मुलांची प्रगती दिसून येईल. कौटुंबिक खर्च वाढेल.
▪️वृश्चिक : व्यवसायात चांगल्या संधी प्राप्त होतील. नवीन कार्यारंभास अनुकूल काळ. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.
▪️धनू : केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. नोकरीची नवीन संधी प्राप्त होऊ शकते. आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या. घरगुती मुद्दे शांततेने हाताळा. 
▪️मकर : वडीलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. महत्त्वाच्या निर्णयापूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्यावा. सामाजिक क्षेत्रात सन्मान वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेताना डोके शांत ठेवा.
▪️कुंभ : सढळ हाताने मदत करा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. हितचिंतकांचा सल्ला मोलाचा ठरेल.
▪️मीन : अधिकारी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्या. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. भावंडांशी नाते दृढ होईल.आततायीपणे निर्णय घेऊ नका.