Take a fresh look at your lifestyle.

भारताचे सर्वात कमी शिकलेले क्रिकेटपटू माहिती आहे का?

नसेल तर जाणून घ्याच !

 

शिक्षण कमी असले तरी तुमच्यातील कौशल्य दाखवून देण्याची धमक कमी पडता कामा नये. याचीच प्रतीती करून देणाऱ्या क्रिकेट खेळाडूंची माहिती आज आपण पाहणार आहोत..

● हार्दिक पांड्या : अष्टपैलू खेळाडू हार्दिकने अनेक वेळा भारताला हरवलेला सामनाही जिंकवला. तो दहावी फेल आहे. मात्र त्याची कामगिरी नेहमीच यशस्वी राहिलेली आहे.
● जसप्रीत बुमराह : गेल्या काही वर्षात केलेल्या कामगिरीने बुमराहची गणना जगातील महान गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याची शैली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. फलंदाजांना नेहमी अडचणीत आणणारा बुमराह 9 वी नापास आहे.

● शिखर धवन : भारताचा सलामीवीर शिखर एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या शिक्षणाबद्दल जर आपण बोललो तर तो फक्त बारावी पास आहे.
● रोहित शर्मा : ‘हिटमॅन’ रोहितने आपल्या कारकीर्दीत तब्ब्ल 3 वेळा दुहेरी शतक ठोकले. जो एक विश्वविक्रम आहे. रोहित फक्त बारावी पास आहे. मात्र त्याच्या समोर गोलंदाजी करायला अनेक दिग्गज गोलंदाज घाबरतात.
● युवराज सिंग : ‘सिक्सर किंग’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या युवराजने 2011 चा वर्ल्डकप भारताला जिंकवण्यात मोलाचे योगदान दिले. युवराज फक्त बारावी पास आहे. मात्र त्याने आपली क्षमता सिद्ध करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.