मुंबई: रिलायन्स जिओने टेक जायंट गुगलसोबत भागीदारी करून खास भारतीय ग्राहकांसाठी तयार केलेला तसेच जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट फोन अशी घोषणा केलेला ‘जिओफोन नेक्स्ट’हा स्मार्टफोन काल ( शुक्रवारी ) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाँच होणार होता. मात्र, आता या फोनच्या लाँचिंगची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जिओकडून प्रसिद्धीपत्रक काढून याबाबतची घोषणा करण्यात आली.
सध्या या स्मार्टफोनची ट्रायल अंतिम टप्प्यात आहे. प्रायोगिक तत्त्वावर या स्मार्टफोनचा वापर सुरु आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या सेमिकंडक्टरचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जिओने आपल्या स्मार्टफोनचे लाँचिंग लांबणीवर टाकल्याचे समजते. आता या स्मार्टफोनचे लाँचिंग दिवाळीत होऊ शकते. 2017 मध्ये, जिओ फोन उत्पादनाच्या क्षेत्रात उतरली आणि गेल्या साडेतीन वर्षात जिओने कमी बजेट आणि चांगल्या फीचर्सचे मोबाईल फोन लाँच केले.
▪️’हे’ आहेत जिओ नेक्स्टमधील 8 महत्त्वाचे फीचर्स.
JioPhone Next अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमच्या ऑप्टिमायझ्ड व्हर्जनवर काम करतो, हे व्हर्जन जिओ आणि गुगलने संयुक्तपणे विशेषतः भारतीय बाजारासाठी विकसित केले आहे.
JioPhone नेक्स्ट अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह येतो ज्यामध्ये व्हॉईस असिस्टंट, भाषा अनुवाद, स्क्रीन टेक्स्टचा स्वयंचलित रीड-अलाऊड आणि यात ऑगमेंटेड रिअॅलिटी फिल्टरसह स्मार्ट कॅमेरा आहे.
JioPhone नेक्स्ट 3,499 रुपयांच्या अंदाजे किंमतीसह लाँच केला शकतो. पण रिलायन्स जिओ या फोनची किंमत कमी करण्यासाठी अधिक ऑफर देऊ शकते.
जिओफोन नेक्स्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 215 प्रोसेसरसह लॉन्च होण्याची शक्यता आहे जे 4 जी नेटवर्कला सपोर्ट करते.
रिलायन्स जिओ खरेदीदाराला 2 जीबी रॅम आणि 3 जीबी रॅम व्हेरिएंट असे दोन पर्याय मिळतील, अशी अपेक्षा आहे. इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये, जिओ 16GB व्हेरिएंट आणि 32GB व्हेरिएंट लॉन्च करू शकते.
डिव्हाइसला HD रिझोल्यूशनसह 5.5 इंच डिस्प्ले मिळेल अशी अपेक्षा आहे.
नवीन जिओफोन नेक्स्ट ब्लू व्हेरिएंटसह विविध रंगांमध्ये लॉन्च केला जाईल.
स्मार्टफोन फास्ट, उच्च दर्जाच्या कॅमेरऱ्यासह सज्ज आहे, ज्याद्वारे रात्री आणि कमी प्रकाशात क्लियर फोटो काढता येतील. फोटो शेअरिंग अॅप स्नॅपचॅटची मूळ कंपनी असलेल्या स्नॅपसोबत गुगलनेही भागीदारी केली आहे, जेणेकरुन स्नॅपचॅट लेन्स थेट फोन कॅमेराला देता येईल.
Reliance Jio परवडणारा आणि गुगल बॅक्ड स्मार्टफोन जिओफोन नेक्स्ट (JioPhone Next) लवकरच लॉन्च होणार आहे. हा फोन 10 सप्टेंबर रोजी रिलीजसाठी सेट आहे, जिओफोन नेक्स्ट हा तुम्ही बाजारात पाहात असलेल्या बहुतेक सर्वच स्मार्टफोनपेक्षा अधिक परवडणारा स्मार्टफोन असणार आहे. परंतु, जिओफोन नेक्स्टच्या नियमित खरेदी व्यतिरिक्त, कंपनी लोकांना विविध पर्याय देऊ इच्छिते जे विस्तृत सेल्स स्ट्रक्चरप्रमाणे आहे. त्यापैकी एक म्हणजे जिओ फोन नेक्स्ट, जो 500 रुपयांत खरेदी करता येईल.