Take a fresh look at your lifestyle.

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा बिगुल वाजला !

'या' तारखेला होणार मतदान.

मुंबई : राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची घोषणा झाली आहे. 21 डिसेंबर 2021 रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील 192 ग्रामपंचायतींच्या 274 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.
ग्रामपंचायत सदस्यांचे निधन, राजीनामा किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. त्यांची छाननी 7 डिसेंबर 2021 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 9 डिसेंबर 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 22 मे 2021 रोजी होईल.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणूकांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देणारे परिपत्रक अहमदनगरचे उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना पाठविले आहे.निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार तारीख निहाय निवडणूक कार्यक्रम घेण्यात यावा, अशा सूचना परिपत्रकांत देण्यात आल्या आहेत.