Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 19 नोव्हेंबर 2021

0

 

▪️मेष : दिवस उत्तमरित्या व्यतीत कराल. व्यावसायिक क्षेत्रात ठाम रहा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. 
▪️वृषभ : प्रिय व्यक्तीकडून भेट मिळेल. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्यावी. अतीविचार करू नका.
▪️मिथुन : यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. स्वभावात करारीपणा बाळगावा. बोलताना तारतम्य बाळगावे. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
▪️कर्क : खर्चाचा आकडा वाढता राहील. अधिकारी वर्गाला नाराज करू नका. दिवस धावपळीत जाईल. घरासाठी आवर्जून काही गोष्टी कराल.
▪️सिंह : संपूर्ण विचार केल्याशिवाय वचन देऊ नका. कलेतून चांगला लाभ होईल. नवीन प्रकल्प हाती घ्याल.लोकांचा विश्वास संपादन कराल.
▪️कन्या : लोकांकडून चांगल्या कामाची प्रशंसा होईल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. रचनात्मक कामे करता येतील. समस्यांचे निराकरण होईल.
▪️तूळ : कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल. भविष्यातील योजनांवर काम चालू करा. मैत्रीचे नवीन प्रस्ताव येतील. उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका.
▪️वृश्चिक : संमिश्र घटनांचा दिवस. क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल. केलेल्या कामातून समाधान मिळेल.
▪️धनू : आर्थिक स्थिती सुधारेल. झोपेची तक्रार जाणवेल. प्रिय व्यक्तीकडून भेट मिळेल. जुन्या गैरसमजुती दूर होतील.
▪️मकर : कामा व्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नये. भावंडांशी मतभेद संभवतात. मानसिक शांतता जपावी. प्रलंबित कामे मार्गी लावाल.
▪️कुंभ : अतीतिखट पदार्थ खाऊ नयेत. उत्तम वाहन सौख्य लाभेल. आपल्यातील आक्रमकतेला आवर घालावा. जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्यात.
▪️मीन : आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न यश देतील. आपल्याच मतावर अडून राहू नका. मानसिक समतोल साधावा. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.
Leave A Reply

Your email address will not be published.