Take a fresh look at your lifestyle.

नाना पटोलेंनी ‘या’साठी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट !

 

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याकरिता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.रजनी पाटील यांना बिनविरोध आणण्यासाठी नाना पटोले आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर आता नाना पटोलेंनी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. यासंदर्भात काँग्रेसने 15 नोव्हेंबर रोजी अधिकृत घोषणा केली आहे.मागील वेळेस रजनी पाटील यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी फडणवीसांची भेट घेतली असता भाजपने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला होता. आता काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनाने विधानपरिषदेची एक जागा रिक्त झाली आहे. याठिकाणी प्रज्ञा सातव यांना बिनविरोध निवडून आणण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत.याबाबत नाना पटोले यांनी प्रज्ञा सातव यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.
त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे तपशील अद्याप माध्यमांसमोर आलेले नाहीत. त्यामुळे ही विधानपरिषद बिनविरोध होणार की नाही? हे स्पष्ट झालेलं नाही.दरम्यान, राज्यात विधानपरिषद निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाचे उमेदवार विजयी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.पुन्हा एकदा नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांकडे निवडणूक बिनविरोध होण्याची मागणी केली आहे. यावर भाजप काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.यावेळी सहा जागांसाठी विधानपरिषद निवडणूक होणार आहे.
राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना सक्रिय राजकारणात उतरवण्याची काँग्रेसची भूमिका आहे.विधानपरिषदेच्या याजागेसाठी 29 नोव्हेंबर रोजी मतदानं होणार आहे. तर 16 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.