Take a fresh look at your lifestyle.

राहुल झावरे यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल !

केवळ राजकीय आकसापोटी गुन्हा दाखल केल्याचे झावरेंचे स्पष्टीकरण.

पारनेर : आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे राज्य सचिव तथा वनकुटे गावचे लोकनियुक्त सरपंच अॅड. राहुल झावरे यांच्या विरोधात शुक्रवारी उशिरा पारनेर पोलिस ठाण्यात मिनीनाथ सूर्यभान बर्डे यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान केवळ राजकीय आकसापोटीच गुन्हा दाखल केल्याचे स्पष्टीकरण अॅड.झावरे यांनी दिले आहे.

▪️फिर्यादीत म्हटले की…

तक्रारदार मिनीनाथ बर्डे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मला येडूमाता मंदिर सभामंडपासाठी ग्रामपंचायतीचा ठराव हवा होता. मी तो सरपंच राहुल झावरे यांच्याकडे मागितला त्यावेळी झावरे यांनी, मी दशक्रिया विधीसाठी गावी येणार आहे. तू तेथे ये, असे सांगितले. त्या वेळी मी व गावातील प्रल्हाद पवार, नाथा बर्डे त्यांच्याकडे गेलो असता, सरपंचांकडे येडूमाता मंदिराला सभामंडप मंजूर झाला असून, त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतीचा ठराव द्यावा अशी मागणी केली. त्यावर त्यांनी, तुला काय करायचे ते कर, तुला सांगितलेले कळत नाही का, असे म्हणून जातिवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

▪️सर्व प्रकारच खोटा : झावरे

दरम्यान, आपण बर्डे यांना मारहाण किंवा शिवीगाळही केली नाही. ही फिर्याद त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून, तसेच दबावापोटी दिली असावी. यातील त्यांनी कथन केलेला सर्व प्रकार हा धांदात खोटा आहे. केवळ राजकीय आकसातून ही फिर्याद दिल्याचे सरपंच अॅड. राहुल झावरे यांनी सांगितले.