Take a fresh look at your lifestyle.

अजितदादांनी ‘या ‘ कारणाने भरसभेत अधिकाऱ्यांना खडसावले !

 

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. कामात जर कोणत्याही प्रकाराचे गैरप्रकार होत असतील तर त्यावर अजित पवार थेट कारवाई करताना दिसून येतात.
एखाद्या कामाला अचानक भेट देण्याची अजित पवारांची पद्धत आहे. त्यामुळे काम नक्की कसं चाललंय, याची योग्य माहिती मिळते, असे अजित पवार म्हणतात. तर कुचकामी करणाऱ्याची सर्वांसमोर अजित पवार कानउघडणी देखील करतात.बारामतीतील एका तालुक्यात अवैध दारूविक्री होत होती. या अवैधरित्या होणाऱ्या दारूविक्रीमुळे अनेक महिला त्रस्त आहेत. अशातच एका महिलेने थेट अजित पवारांनाच एक निवेदन दिले.
आपला नवरा दररोज दारू पिऊन घरी येतो, मारहाण करतो आणि त्रास देतो, असे या महिलेेने निवेदनात म्हटले होते. त्यामुळे बारामतीतील अवैध दारूविक्री बंद करावी, अशी मागणी या महिलेेने केली आहे. त्यानंतर भर सभेत अजित पवारांनी हे निवेदन हातात घेतलं आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. डीवायएसपी साहेब दारूबंदी करावी, अशा मागणीचं निवेदन मला आलंय. 2007 मध्ये आपल्याकडे दारूबंदी झाली होती, असं अजित पवार डीवायएसपीसमोर म्हणाले.
सन 2007 मध्ये आपल्याकडे दारूबंदी झाली, आता ती पुन्हा सुरू झाली आहे. या गोष्टीचा त्रास सध्या सर्व गोरगरिब महिलांना होताना दिसतोय, असेही अजित पवार म्हणाले आहेत.सर्वांना त्रास होतोय, मग नेमका प्रॉब्लेम काय आहे? आता तुम्ही कायमची दारू बंदी करून टाका, काय लावायचंय ते लावा पण दारू बंदी करून टाका, असे अजित पवारांनी अधिकाऱ्यांना यावेळी खडसावले आहे.
जे काही असतील ते टाडा लावा, तुम्ही चांगले डीवायएसपी म्हणून मी तुम्हाला बारामतीत आणलं होते, असेही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.बारामतीतील कोणत्याही भागात चालू असलेले दोन नंबरचे धंदे आधी बंद करा. हातभट्ट्या आधी बंद करा असेही अजित पवार म्हणाले आहेत.दरम्यान, भर कार्यक्रमात अजित पवारांनी थेट अॅक्शन घेण्याचे आदेश दिल्याने बारामतीत अजित पवार चर्चेचा विषय ठरले आहेत.