Take a fresh look at your lifestyle.

स्वतःला आणि दुसऱ्याला आनंद देतं तेच खरं अध्यात्म !

दंभ सगळ्याची वाट लावतो.

बाबांना मी म्हटलं की बाबा आता तुमचा मुलगा सुन तुमच्या समोर आहेत. काय समस्या आहे?हे आता समोरासमोर सांगा बरं?..बाबा काही बोलेनातच.फक्त एवढच म्हणाले,अध्यात्माचं त्यांना फार वावडं आहे.मग सुनबाईंनाच विनंती केली की काय समस्या आहे हे तुम्ही तरी सांगा?बोललात तरच काही मार्ग काढता येईल.मग सुनबाई सांगु लागल्या,”आम्ही दोघेही सकाळी दहा वाजता कंपनीत जातो ते रात्रीचे दहा,अकरा घरी यायला होतात.घरात स्वयंपाक करण्यासाठी बाई आहे. सासऱ्यांसाठी आठ वाजता स्वयंपाक तयार असतो.बाळ त्यांच्याकडेच असतो दिवसभर.ते गेल्यापासुन महिनाभर तो निट झोपला नाही.”
मग मी म्हटलं इतकं सगळं चांगलं चाललेलं असताना असं काय घडलं? सुनबाई म्हणाल्या,”सासरे अतिशय धार्मिक आहेत,ते कुणालाही अपशब्द बोलत नाहीत. पण एक गोष्ट अशी आहे की ती आम्हाला सर्वांना त्रासदायक ठरत आहे. ते पहाटे चारला हरिपाठ म्हणतात.”असं सांगत असतानाच साधारण अर्धा,पाऊन किलोची एक पितळी घंटा त्यांनी आमच्यासमोर ठेवली.आणि म्हणाल्या,”ही घंटा ते मोठमोठ्याने वाजवतात.आता मी फ्लॅटचे दार बंद करते आता ही घंटा वाजवा म्हणजे किती आवाज होतो हे कळेल.आम्हाला झोपायला रात्रीचे बारा वाजतात,आमची तर झोपमोड होतेच पण बाळही उठते त्याचीही झोप होत नाही. लग्न होऊन इथं आल्यापासून हे आम्ही सासऱ्यांना समजावून सांगत आहोत.पण ते काही ऐकायला तयार नाही.
त्यादिवशी मी वैतागून म्हणाले,की तुम्ही दुसरीकडे कुठेतरी रहा.या एका शब्दावर सासरे घर सोडून निघुन गेले.”
मी बाबांकडे पाहिलं.ते खाली मान घालुन रडत होते.मी बाबांना म्हटलं,बाबा हे सगळं खरं आहे का?त्यांनी मानेनेच होकार दिला.आज बाबांचं अध्यात्मिक जीवन कुटुंबासाठी समस्या बनलं होतं.अध्यात्म आत्मशांतीकडे नेतं,ते परोपकार शिकवतं.पण त्याचा यथायोग्य वापर झाला नाही तर ते केवळ पाखंड ठरतं.अर्धवट ज्ञानाचा झालेला दंभ हे सारं करुन घेत असतो.पुढे बरच काही घडलं,चर्चासत्रे झडली.ते सविस्तर सांगत नाही पण इतकच सांगतो ती घंटा आम्ही आमच्या सोबत घेऊन आलो आहे.
आता दोन वर्षे झाली या घटनेला. सगळं मजेत चाललं आहे.बाबांच्या सात वर्षांच्या नातवाने मला फोनवर हरिपाठ म्हणून दाखवला. सज्जनहो ही अध्यात्माची जादु आहे. ती कधीच कुणालाही अपायकारक ठरत नाही.पण व्यक्त करण्यासाठी काळ वेळेचं बंधन आहे.नामचिंतनासाठी मात्र कोणतही बंधन नाही.सुखी प्रपंचाची वाट अध्यात्म नावाच्या गावातुन गेली तर आत्मानंदाने न्हाऊन निघाल.
रामकृष्णहरी