Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸16 नोव्हेंबर 2021

0
▪मेष : आपली स्वप्ने पूर्णत्वास जातील. रोजगाराच्या क्षेत्रात यश मिळेल. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा. मिळकत व खर्च यांचे संतुलन ठेवावे. 
▪️वृषभ : मनातील नकारात्मक विचार काढून टाका. कष्टाशिवाय काही हाती लागणार नाही. यात्रा सुखकर होईल. जमिनीच्या कामातून लाभ होईल.
▪️मिथुन : दिवस उत्तम फलदायी असेल. आर्थिक बाबतीचे प्रयत्न यश देतील. तज्ञ व्यक्तींची भेट होईल. शेजार्‍यांचे सहकार्य मिळेल.
▪️कर्क : वरिष्ठांना नाराज करू नका. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. वाणीत माधुर्य जपावे.मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.
▪️सिंह : प्रवासात काळजी घ्यावी. हातापायांना इजा संभवते. वैचारिक स्थिरता ठेवावी. आपले छंद जोपासावेत.
▪️कन्या : व्यवसायात मान वाढेल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. संपर्कातील लोकांशी जवळीक वाढेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल.
▪️तूळ : धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. एखादी मौल्यवान वस्तु मिळेल. विरोधक पराभूत होतील. नवीन काम सुरू करू शकता.
▪️वृश्चिक :कामाचा ताण जाणवेल. उगाच चिडचिड करू नये. जोखमीचे पाऊल उचलताना सारासार विचार करावा. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल.
▪️धनू : आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. हातातल्या कामाचा कंटाळा करू नका. मौल्यवान वस्तूंचे जतन करा. भावंडांचे सहकार्य मोलाचे ठरेल.
▪️मकर : वैवाहिक जीवन सुखमय होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणावरही अति विश्वास दाखवू नका. समस्यांचे निराकरण होईल.
▪️कुंभ : थोडीशी धावपळ करावी लागेल. देवावरील श्रद्धा वाढेल. जोडीदाराच्या मदतीने अडकलेल्या गोष्टी पुढे सरकतील. पैशाच्या बाबतीतले प्रयत्न यश देतील.
▪️मीन : मानसिक शांतता लाभेल. प्रवास लाभदायक ठरतील. मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील. बोलताना शब्द जपून वापरा.
Leave A Reply

Your email address will not be published.