Take a fresh look at your lifestyle.

काय सांगता ? 1 कोटीला बैल !

अशी आहे खासियत? वाचाच...!

0

 

बंगळुरूमध्ये नुकतंच चार दिवसीय कृषी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी कृष्णा नावाचा बैल अतिशय चर्चेत होता. त्याला पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. त्यामुळेच साडे तीन वर्षांचा हा बैल खरेदी करणाऱ्यांची पहिली पसंत ठरला.

बैलाचे मालक बोरेगौडा यांनी सांगितलं की, हा हल्लीकर जातीचा बैल आहे. या जातीच्या बैलाचं स्पर्म म्हणजेच वीर्याची मागणी खूप असते. त्याच्या वीर्याचा एक डोज एक हजार रुपयांमध्ये विकला जातो. हल्लीकर जातीच्या जितक्याही गायी आहेत त्याच्या दुधात जास्त प्रमाणात प्रोटीन असतं.

मात्र आता ही जात हळू-हळू लुप्त होत आहे. कृष्णाला खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी थेट कोटींची बोली लावली. मेळाव्यात एका खरेदीदाराने कृष्णाला 1 कोटी रुपयात खरेदी केले. त्यामुळे कृष्णाच्या लिलावाचा आनंद मालकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.

बोरेगौडा यांनी सांगितलं की, कृष्णाचं वय साडे तीन वर्षे असलं तरी तो मोठ-मोठ्या बैलांना मागे सोडतो. या मेळाव्यात सर्वसाधारण बैल एक ते दोन लाखांना विकला जातो. मात्र इतका महाग बैल विकला जात नाही. यंदा कृष्णाने सर्व रेकॉर्ड तोडले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.