Take a fresh look at your lifestyle.

आगामी निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवून देणार !

सभापती काशिनाथ दाते यांचे प्रतिपादन. 

 

पारनेर : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी पंधरा वर्षाच्या कारकीर्दीत तालुक्यात विकासाची गंगा आणली. मी ही सभापती पदाच्या माध्यमातून गावोगावी विकासकामे करीत आहे.आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकांमध्ये आम्ही सर्व एकजुटीने शिवसेना पक्षाची ताकद दाखवुन असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी केले.
तालुक्यातील कर्जुले हर्या येथील पंढरीनाथ उंडे यांची संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर व माजी आमदार विजय औटी यांच्या सुचनेनुसार उपतालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली त्यावेळी दाते बोलत होते. साहेबराव वाफारे,विकास रोकडे,अनंथा शिर्के ,रामदास आंधळे राजु आंधळे,बाळासाहेब उंडे ,दिपक उंडे,प्रवीण बनसाळी उपस्थित होते.
पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार संघटन वाढवावे व समाजभिमुख काम करावे या करीता ही निवड करण्यात आली.

एका निष्ठावान शिवसैनिकांला पक्षाने संधी दिली असून यापुढील काळातही शिवसेना पक्षवाढीसाठी व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी त्यांनी काम करावे असे आवाहन दाते यांनी केले.