पारनेर : तालुक्यातील जवळा गेल्या महिन्यात २० ऑक्टोबर रोजी शाळकरी मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची निर्दयी घटना घडली त्याचे पडसाद संबंध राज्यात उमटले या हत्याकांडाचा तपास अद्यापही लागला नसून सुरवातीपासून पोलीस यंत्रणेला संपर्क केला असता तपास चालू आहे हे एकच साचेबद्ध उत्तर ऐकण्यास मिळत आहे त्यामुळे जवळा ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
त्यामुळे पारनेर पोलीसांना या प्रकरणाचा तपास लागेल की नाही याबाबत नागरिकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांनी दोन वेळेस आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता पोलीस यंत्रणेने मुदत मागून घेत आंदोलन न करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले असता ग्रामस्थांनी ही ते स्वीकारले पण मग पुढील तपासाचे काय झाले ? अत्यंत धीम्या गतीने तपास चालू असल्याचे नागरिक बोलत आहेत
त्यामुळे राज्यात या हत्याकांडाचे पडसाद उमटले असताना तपासात शक्य तितके यश येत नसल्याचे दिसते.
तपासाच्या प्रगती बाबत वेगळी कोणतीही माहिती देण्यास पोलीस असमर्थता दर्शवित आहेत फक्त तपास चालू आहे
गावातून तशी आत्तापर्यंत सुमारे साठ ते सत्तर जणांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेत त्यांची चौकशी केली व त्यात काहींची डी एन ए चाचणी केली आहे त्याचे काही अहवाल आले आहेत तर काही येणे बाकी आहे जे आलेत त्यातही काही धागे दोरे लागत नसल्याने नेमका गुन्हेगार शोधण्यात पोलीस हतबल झाले असल्याचे समजते.
त्यामुळे या खून प्रकरणाचा तपास लागेल की नाही अशी आता जवळेकरांना शंका निर्माण होऊ लागल्याने गावातील सौ.रंजना पठारे,सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे व महिलांनी व येत्या आठ दिवसात तपास न लागल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.