Take a fresh look at your lifestyle.

नाना पटोलेंनी राष्ट्रवादीला काँग्रेसला डिवचले ?

म्हणे, 'त्यांचे' दुकानं बंद व्हायला किती वेळ लागतो.

बुलढाणा : महाविकास आघाडी सरकार म्हणून जरी एकत्र काम करत असले तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमधील कुरबूरी कायमच दिसून येतात. बुलढाण्यामध्ये याचाच प्रत्यय आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील एकमेव दुकानही बंद होईल असे म्हणतं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याच मित्रपक्षाला पुन्हा एकदा डिवचले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राष्ट्रवादीचे सगळे महान नेते असून पंढरपूरमध्ये हरले. आज राष्ट्रवादीचे तिकीट घेवून त्यांचे पश्चिम महाराष्ट्रातील दुकान बंद होत असेल तर बुलढाण्यातील दुकान बंद व्हायला वेळ लागतो किती. एकच तर दुकान आहे बुलढाण्यामध्ये, ते विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव दुकान बंद व्हायला वेळ लागणार नाही.
नाना पटोले यांना पुन्हा या वक्तव्याबाबत खुलासा विचारला असता ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भात दुकान नाही, हे अनेकदा विदर्भातील जनतेने दाखवून दिले आहे. त्यामुळे दुकान आहे, असे म्हणणे पण चुकीचे होईल, असेही नाना पटोले म्हणाले आहेत. बुलढाण्यामध्ये राष्ट्रवादीकडून सिंदखेड राजा इथून राजेंद्र शिंगणे निवडून आले आहेत.