Take a fresh look at your lifestyle.

पारनेरात भाजपाचा स्वबळावर नारा!

सुजित झावरे यांच्याकडे मतदार संघप्रमुखाची जबाबदारी.

 

पारनेर: आगामी पंचायत समिती,जिल्हा परिषदेच्या निवडणुकी संदर्भात आढावा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी पारनेर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये निवडणूका स्वबळावर लढण्याचा तसेच पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदाची जबाबदारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.

येथे शासकीय विश्रामगृहावर भाजपाची बैठक पार पडली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,जिल्हा सरचिटणीस दिलीप भाई सिंग, जिल्हा बुथ संयोजक मनोज कुलकर्णी, पारनेर बूथ प्रभारी सुभाष गायकवाड, पारनेर तालुकाध्यक्ष वसंत चेडे उपस्थित होते.पारनेर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख सुजित झावरे यांनी बुथ रचनेचा आढावा घेतला.बुथ रचना तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासंबंधीचा निर्णय या बैठकी घेण्यात आला.

आगामी काळात होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक संदर्भातही बैठकीत चर्चा झाली त्यात पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या बैठकीमध्ये किरण बाळासाहेब कोकाटे यांची पारनेर शहर प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

या बैठकीसाठी सुनील थोरात, सुभाष दुधाडे,बाळासाहेब नरसाळे, कृष्णाजी बडवे बाबासाहेब हरिभाऊ चेडे ,पोपटराव मोरे तुषार पवार, सागर मेड, रामदास नवले ,गंगाधर सालके, सचिन ठुबे, मनोहर राऊत, सुनील उमाप दिपक भागवत, आनंद गांधी व भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.सुजित झावरे यांचा मतदार संघाचे प्रमुख झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सागर मैड यांनी उपस्थितांचे आभार मानले.