Take a fresh look at your lifestyle.

बालदिन नक्की का साजरा केला जातो?

या बाबतचा इतिहास जाणून घ्या! 

0

 

जगभरात २० नोव्हेंबरला तर भारतातमध्ये १४ नोव्हेंबरला बालदिन का साजरा केला जातो? याविषयीचा इतिहास आज जाणून घेऊयात.
जगभरात १९२५ पासून ‘बाल दिन’ साजरा करायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्र संघाने २० नोव्हेंबर १९५४ ला बाल दिनाची घोषणा केली होती. भारतात मात्र १९६४ नंतर १४ नोव्हेंबरला ‘बाल दिन’ साजरा केला जाऊ लागला.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लहान मुलांसाठी चाचा नेहरू होते. २७ मे १९६४ ला त्यांचे निधन झाले. लहान मुलांच्या लाडक्या नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात १४ नोव्हेंबरला भारतात ‘बाल दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला.
मुलांचे हक्क काय? : भारतातील राज्य घटनेनुसार मुलांच्या हक्कांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
● ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा अधिकार आहे.

● कोणत्याही धोकादायक रोजगारापासून संरक्षित करण्याचा अधिकार आहे.
● बालपण काळजी आणि शिक्षणाचा अधिकार आहे.
● गौरवयापासून संरक्षित होण्याचा अधिकार आहे.
● लहान मुलांच्या वय किंवा सामर्थ्यला अनुकूल नसलेल्या व्यवसायामध्ये प्रवेश करण्यापासून संरक्षित करण्याचा अधिकार आहे.

● निरोगी पद्धतीने विकसित होण्यासाठी समान संधी आणि सुविधा मिळण्याचा अधिकार आहे.
● स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेचा हक्क आणि शोषणाविरुद्ध बालपण आणि तरुणपण याचे संरक्षण.
Leave A Reply

Your email address will not be published.