Take a fresh look at your lifestyle.

‘या’ मंदिरात प्रसाद म्हणून मिळतात सोने-चांदीची दागिने!

0

 

आपल्या देशात लाखो मंदिरे आहेत. यातील बऱ्याच मंदिरांमध्ये विविधता पहायला मिळते. असेच एक अनोखे मंदिर म्हणजेच मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील महालक्ष्मी मंदिर.
रतलाम जिल्ह्यातील माणकमध्ये असणारे हे मंदिर एका वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्ध आहे. येथे भक्तांना प्रसाद स्वरूपात लाडू आणि अन्य खाद्यपदार्थ नव्हे तर, सोन्या चांदीचे दागिने दिले जातात. त्यामुळे येणारे भक्त मालामाल होऊन परतात.
प्रत्येक भक्ताला येथे प्रसाद स्वरूपात सोने-चांदीची नाणी आणि दागिने दिले जात असल्याने येथे भक्तांची नेहमीच गर्दी असते. महालक्ष्मीचे भक्त मंदिरात कोट्यावधींचे दागिने किंवा रोख दान करतात.
येथे दिवाळीच्यानिमित्ताने कुबेराचा दरबार लागतो. या दरम्यान धनत्रयोदशीपासून पाच दिवसांपर्यंत मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. यावेळी मंदिराला फुलांनी नव्हे तर, पैसे आणि दागिन्यांनी सजवले जाते. या दरबारात भक्तांना प्रसादाच्या स्वरूपात सोने-चांदेचे दागिने आणि रुपये दिले जातात.
विशेषतः दिवाळीच्या दिवसांमध्ये मंदिराचे कपाट दिवस-रात्र खुले राहते. धनतेरसच्या दिवसांमध्ये येथून कोणताही भक्त रिकाम्या हाती परतत नाही.
Leave A Reply

Your email address will not be published.