Take a fresh look at your lifestyle.

SBI Bank Loan Scheme | स्टेट बँकेची ग्राहकांसाठी विशेष कर्ज योजना !

'अशी' तपासा तुमची कर्जमर्यादा.

नवी दिल्लीः स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना केवळ बचत खाते किंवा एफडीसंदर्भात सुविधा पुरविण्यापुरतचीच मर्यादित नाही तर ग्राहकाला जेंव्हा आर्थिक गरज भासते, तेव्हा बँकेकडून मदत केली जाते. बँकेकडून ग्राहकांना विविध प्रकारची कर्जे दिली जातात, ज्यात पूर्व मान्यताप्राप्त वैयक्तिक कर्जा यांचा समावेश आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यावे लागते, तेव्हा तुम्ही प्रथम बँकेशी संपर्क साधता आणि त्यानंतर तुम्हाला किती कर्ज मिळू शकते हे पाहिले जाते. मग फाईल तुमच्या कागदपत्रांवर पुढे जाते आणि दीर्घ प्रक्रियेनंतर कर्ज मिळते, परंतु पूर्व मंजूर कर्जामध्ये ही अडचण नसते.( SBI Bank Loan Scheme )

▪️तर एसबीआय कडून तुम्हाला हे विशेष कर्ज मिळू शकते.

जर तुम्हाला देखील या प्रकारचे कर्ज घ्यायचे असेल, तर एसबीआय कडून तुम्हाला हे विशेष कर्ज मिळू शकते, ज्यात ग्राहकांना दीर्घ प्रक्रिया पूर्ण करावी लागत नाही आणि तुम्हाला कर्ज सहजपणे मिळते. या कर्जामध्ये तुमच्या खात्यानुसार आधीच एक मर्यादा निश्चित केलीय, तुम्ही सहजपणे तुम्हाला जेवढ्या पैशांची आवश्यकता आहे, तशा पद्धतीत तुमच्या खात्याची मर्यादा किती आहे आणि तुम्ही किती कर्ज सहज मिळवू शकता हे आधीच तपासू शकता.

▪️कर्ज मर्यादा कशी तपासायची?

जर तुम्हाला तुमच्या पूर्व मंजूर कर्जाची मर्यादा जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला बँकेच्या नंबरवर मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून PAPL <space> XXXX लिहावे लागेल आणि नंतर ते 567676 वर पाठवावे लागेल. या XXXX मध्ये खाते क्रमांकाचे 4 अंक लिहावे लागतील.

▪️कर्ज कसे मिळवायचे?

YONO अर्जाद्वारे बँकेच्या पूर्व मंजूर वैयक्तिक कर्जाची सुविधा मिळू शकते. ही सुविधा झटपट, पेपरलेस, विश्लेषण प्रक्रियेच्या आधारावर कार्य करते. YONO मध्ये लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ही कर्जाची ऑफर होम पेजवर दिसेल.

▪️पीएपीएल म्हणजे काय?

तुम्हाला पीएपीएलच्या पूर्ण स्वरूपावरूनच समजेल की, या कर्जाबद्दल विशेष गोष्ट काय आहे. त्याचे पूर्ण नाव पूर्व मंजूर वैयक्तिक कर्ज आहे. हे एक प्रकारचे पूर्व मंजूर कर्ज आहे, ज्यात कर्जाची जास्तीत जास्त रक्कम पूर्व निर्धारित आहे, जी तुमच्या खात्यातील व्यवहार, क्रेडिट स्कोअर इत्यादींवर अवलंबून असते. आपण कोणतेही कर्ज जास्तीत जास्त रकमेपर्यंत घेऊ शकता, ज्यासाठी जास्त कागदपत्रांची आवश्यकता नाही.

▪️हे कर्ज कोण घेऊ शकेल?

हे कर्ज त्याच बँकेतून घेतले जाऊ शकते, ज्यामध्ये खाते चालू आहे. उदाहरणार्थ, जर तुमचे एसबीआय मध्ये खाते असेल तर तुम्ही हे कर्ज एसबीआय कडून घेऊ शकता. तुमच्या खात्यातील व्यवहारावर अवलंबून बँक तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवते. यासाठी एक रक्कम निश्चित केलीय, त्यानुसार तुम्ही कर्ज घेऊ शकता.

Personal loan