Take a fresh look at your lifestyle.

न्यूमोनियाची लक्षणे आणि प्रकार काय?

आरोग्यविषयक माहिती जाणून घ्या!

न्यूमोनिया हा आजार फुफ्फुसात झालेल्या संसर्गामुळे होतो. हा गंभीर आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीस होऊ शकतो. त्यामुळे वेळीच निदान होऊन उपचार झाले नाहीत तर रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. चला, तर या आजाराची लक्षणे आणि प्रकार काय आहेत? पाहूयात…
न्यूमोनियाची लक्षणे काय?
● ताप येतो किंवा तशी लक्षणे जाणवतात.
● खोकला हे प्रमुख लक्षण आहे.
● खोकल्यातून बेडका पडतो.
● हा रुग्ण अशक्त आणि थकलेला दिसतो.
● रुग्णाला ताप आणि घाम सोबतच थंडी मोठ्या प्रमाणावर जाणवते.
● श्वास घेताना प्रचंड त्रास होतो. दरम्यान वेगाने श्वास घेतल्याने घसा कोरडा पडून खोकला सुरु होतो.
● प्रचंड डोकेदुखी आणि अस्वस्थताही जाणवते.
न्यूमोनियाचे प्रकार :
● बॅक्टीरियल न्यूमोनिया.
● व्हायरल न्यूमोनिया.
● माईकोप्लाज्मा न्यूमोनिया.
● एस्पिरेशन न्यूमोनिया.
● फंगल न्यूमोनिया.
या आजारात प्रामुख्याने फुफ्फुसाला सूज येते. काही वेळा फुफ्फुसात पाणीही भरले जाते. योग्य वेळीच लक्षणे पाहून उपचार करणे आवश्यक असते.