Take a fresh look at your lifestyle.

‘या’ देशात आहे गणपती बाप्पाची सर्वात उंच मूर्ती!

कांस्य धातूचे जोडले 854 वेगवेगळे भाग.

 

 

गणेश चतुर्थीच्या आज गणरायाची देशभरात प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येत आहे. मात्र बाप्पाची सर्वात उंच मूर्ती कुठे आहे? असे तुम्हाला विचारले तर तुम्हाला वाटेल याचे उत्तर भारत असेल. मात्र हे खरे नसून सर्वात उंच बाप्पाची मूर्ती थायलंडमध्ये आहे.

ही गणेशाची मूर्ती थायलंडच्या ख्लॉन्ग ख्वेन शहर शहरातील गणेश इंटरनॅशनल पार्कमध्ये स्थापित करण्यात आली आहे. प्रख्यात मूर्तिकार पिटक चर्लेमलाओ यांनी कांस्य धातूपासून बनवलेल्या या मूर्तीची उंची 39 मीटर आहे. ही मूर्ती 2008 ते 2012 या दरम्यान उभारण्यात आली. ही मूर्ती कांस्य धातूच्या 854 वेगवेगळ्या भागांना जोडून बनवली गेलीय.

या गणेशाच्या मूर्तीच्या डोक्यावर कमळ आणि मध्ये ओम पहायला मिळतो. थायलंडमध्ये पवित्र कार्यात वापरली जाणारी फळे (फणस, आंबा, ऊस आणि केळी) बाप्पाच्या हातात दिसत आहेत. तसेच बाप्पाच्या पोटाला साप वेटोळे घालून बसल्याचे दिसत असून सोंडेत लाडू आणि पायाजवळ बाप्पाचे वाहन उंदीर दिसत आहे.

थायलंडमधील अयुथ्या साम्राज्यात ‘चाचोएंगशाओ’ नावाचे शहरात ‘चाचोएंगशाओ असोसिएशन’ ही संस्था धार्मिक आणि सामाजिक कार्यात आघाडीवर असते. या असोसिएशनचे अध्यक्ष पोल जेन समाचाई वानीशेनी यांनी जगातील सगळ्यात उंच गणपतीची मूर्ती बनवायचे ठरवले आणि ते करून दाखवले.