Take a fresh look at your lifestyle.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय खावं? काय नाही?

आपल्या आरोग्यासाठी नक्की वाचाच !

अलीकडे कमी वयातच हृदयरोगांचा सामना करावा लागत आहे. याला कारण लोकांची बदलती लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, दुर्लक्ष करणे आदी बाबी आहेत.

यामुळे हृदय निरोगी ठेवणं फार गरजेचं झालंय. मात्र अनेकांना हे माहीत नसतं की, हृदय निरोगी कसं ठेवावं? चला, तर आज आम्ही तुम्हाला हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय खावं? काय नाही? याबाबत सांगणार आहोत!

काय खावं?

1) वेगवेगळी फळं आणि हिरव्या भाज्या आहारात असू द्या. तसेचड्राय फ्रूट्स, नट्स आणि सीड्स जसे की, बदाम, अक्रोड, पिस्ता, शेंगदाणे, कलिंगड इत्यादींच्या बीया फायदेशीर ठरतात.

2) ग्रीन, ब्लॅक टी चं सेवन करूनही शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करू शकतात.

काय खाऊ नये? :

1) जेवणात वरून मीठ घेण्याची सवय जास्त घातक आहे. तसेच वेगवेगळ्या फास्ट फूडमध्येही मिठाचं प्रमाण अधिक असतं. या जास्त मिठामुळे हृदयाचं नुकसान होतं.

2) जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ कमी खा. फास्ट फूड आणि जंक फूड फार कमी खा. कारण मार्केटमधील हे पदार्थ फारच स्वस्त आणि खराब क्वालिटीच्या तेलात किंवा तूपात तयार केलेले असतात. याचा थेट प्रभाव हृदयावर पडतो.

3) प्रोसेस्ड आणि प्रिजर्व्ड म्हणजे डब्यात बंद असलेले पदार्थ खाल्ल्याने आरोग्य खासकरून हृदयाला जास्त नुकसान होतं.

4) सेमी कुक्ड पदार्थ जसे की, भाज्या, बिर्याणी, पराठे, मिठाई इत्यादी तसेच पॅकेटमधील ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्स सुद्धा हृदयासाठी नुकसानकारक ठरतं.

गोड नक्की काय खायचं ? : पांढऱ्या साखरेऐवजी ब्राउन शुगरचा वापर करा. तसेच नॉन-रिफाइंड गूळ सर्वात चांगला पर्याय आहे. या गुळावर काळपटपणा आलेला असतो. पण आरोग्यासाठी तो चांगला असतो.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ‘पारनेर दर्शन’ घेत नाही.