लहान मुलं सर्वांनाच आवडतात. पण तुम्हाला जर कोणी लहान मुलाला शेपटी आहे असं सांगितलं तर सुरुवातीला . पण हो हे खरं आहे. अशीच एक घटना
ब्राझीलमध्ये एक अशी दुर्मिळ घटना घडली आहे. ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. ती म्हणजे 12 सेंटीमीटर लांबीच्या शेपटीसह एका बाळाचा जन्म झालाय. या घटनेमुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत.
डॉक्टरांनी शेपटीसह असे बाळ जन्माला येणं अत्यंत दुर्मिळ असल्याचं म्हटलं. या बाळाच्या जन्मासंबंधित महत्त्वाची माहिती आणि काही फोटो एका मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेत. ब्राझीलच्या फोर्टालेजा या शहरातील अल्बर्ट सबिन चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये या बाळाचा जन्म झालाय.
डॉक्टरांच्या माहितीनुसार आईच्या गर्भात असताना प्रत्येक भ्रूणालाच शेपटी असते. भ्रूण जसजसा मोठा होत जातो, त्याला आकार येत जातो, तसतशी शेपटी नष्ट होते; मात्र काही अगदी दुर्मिळ केसेसमध्ये ही शेपटी जन्मानंतरही तशीच राहते. या बाळाबाबतही असंच झालं. बाळाची शेपटी मांसाची होती आणि त्यात कोणतंही हाड नव्हतं. या बाळाच्या शेपटीची लांबी 12 सेटींमीटर इतकी वाढली होती. या शेपटीचं टोक क्रिकेटच्या बॉलसारखं गोल होतं. हे पाहून सुरुवातीला डॉक्टर्सही हैराण झाले होते.
आत्तापर्यंत हाड नसलेल्या शेपटीसह एकूण 40 बाळं जन्माला आल्याची नोंद आहे. मात्र ही शेपटी मज्जासंस्थेशी जोडली नसल्याने ती ऑपरेशन करून काढता येऊ शकली, असं सोनोग्राफीच्या वेळेस डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे ती काढण्यात देखील आली. या बाळाचा जन्म नियोजित तारखेआधी झाला होता. सध्या या बाळाची तब्येत व्यवस्थित आहे.