पारनेर : तालुक्यातील नारायणगव्हाण गावाच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असणारा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी दिली.
नारायणगव्हाण येथे सभापती गणेश शेळके यांच्या पंचायत समिती १५ व्या वित्तआयोग निधी मधून पिण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले त्याचा लोकार्पण व गावठाणात कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा जलपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. या प्रसंगी सभापती दाते बोलत होते.
पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके,राहुल शिंदे पाटील,युवा सेना तालुका प्रमुख नितीन शेळके, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, माजी सरपंच सुरेश बोरुडे, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब चव्हाण, व्हाईस चेअरमन बबन खोले, शंकर चव्हाण मेजर, काशिनाथ नवले, बाळासाहेब गोरे, अण्णा चव्हाण, बंडोपंत नाईक, राजू सोन्याबापू शेळके, गणेश विक्रम शेळके, विष्णू चिपाडे,भानुदास वेताळ,विष्णू दरेकर, अरुण चिपाडे,छबुशेठ चिपाडे, ग्रामसेवक गायकवाड
कडूसचे सरपंच मनोज मुंगसे, मुकेश गवळी,रवींद्र पाडळकर,आनंदा खोले,सचिन शेळके,सहादू मामा शेळके,अभि अवचिते, सतीश गाडीलकर, नितीन कोहकडे,राजू अवचिते,प्रसाद भोसले,शिवाजी भोसले,अजय शेळके गणेश कोहकडे,सुनील दाते, अजिंक्यतारा दरेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.