Take a fresh look at your lifestyle.

बडीशेप खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित नसतील!   

बडीशेपमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे आपल्याला निरोगी आयुष्य प्रदान करू शकतात. बडीशेप ही केवळ स्वयंपाक घरातील एक मसाला नाही, यामध्ये कॅल्शिअम, सोडिअम, फॉस्फरस, आयर्न आणि पोटॅशिअम यांसारखे तत्व आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात. चला, तर आज आपण बडीशेपचे विविध फायदे जाणून घेऊयात… 
● बडीशेप खाण्याने तुमच्या त्वचेच्या तक्रारी दूर होतात. आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स, मुरुम दूर होऊ शकतात.

● बडीशेपमुळे आपल्या शरीरातील हार्मोनची पातळी चांगली राहते. तसेच पिंपल्स पासून देखील आपला बचाव होतो.
● रक्ताचे शुद्धीकरण होण्यास मदत, बडीशेप मध्ये विशिष्ट प्रकारचे तैलीय घटक असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी ही बडीशेप मोठी उपयोगी ठरते.
● बडीशेपमध्ये व्हिटॅमिन A, अमिनो ॲसिड आणि अँटीऑक्सिडेंट हे तीनही घटक अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणूनच जे लोक बडीशेपचं सेवन करतात, त्यांच्या डोळ्यांचं आरोग्यही चांगलं राहतं.
● बडीशेपमध्ये असणारे घटक आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.
● बडीशेप जर आपण रोज खाल्ली तर आपल्या हृदयाशी निगडित जे आजार आहेत, ते दूर होण्यास मदत होऊ शकते. बडीशेपमध्ये पोटॅशिअम नावाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि या पोटॅशिअममुळेच आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालतो.