Take a fresh look at your lifestyle.

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाच्या तारखा बदलल्या !

0
पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या उरूळी कांचन येथे होणारया अधिवेशनाच्या तारखा बदलल्या असून हे अधिवेशन आता २७ आणि २८ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार अधिवेशनाचे उद्घाटन करणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकात देण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे द्वैवार्षिक अधिवेशन १८ आणि १९ डिसेंबर रोजी होणार होते.मात्र अचानक उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे अधिवेशन २७ आणि २८ डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय काल झालेल्या संयोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.. बदललेल्या तारखांची नोंद घेऊन राज्यातील पत्रकारांनी मराठी पत्रकार परिषदेला सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त संख्येने अधिवेशनास उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी केले आहे.
उरूळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात हे अधिवेशन होत असून तेथे २००० पत्रकार बसू शकतील असा भव्य मांडव घालण्यात येत आहे. खा.शरद पवार यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकात देण्यात आली आहे.
पत्रकावर एस.एम.देशमुख, कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, समन्वयक सुनील जगताप, सोशल मिडिया सेलचे पुणे जिल्हा प़मुख जनार्दन दांडगे, तुळशीराम घुसाळकर, गणेश सातव आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.