Take a fresh look at your lifestyle.

आम्हालाही शिव्या देता येतात पण… माजी खासदारांचा इशारा.

सोलापूर : गेल्या 12 दिवसांपासून सोलापुरातील काँग्रेस भवनासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना थकित ऊस बिलासंदर्भात हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे.

सध्या मातोश्री साखर करखान्याचा कारभार माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्याकडे आहे. या आंदोलनावर तोडगा निघावा यासाठी काही शेतकरी सिद्धराम म्हेत्रे यांच्याकडे चर्चा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना सिद्धराम म्हेत्रे यांना राग अनावर झाला आणि त्यांनी शेतकऱ्याला शिवीगाळ केली. त्याचा एक व्हिडीओ देखील सध्या व्हायरल झाला आहे.
सिद्धराम म्हेत्रे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सिद्धराम म्हेत्रे यांना थेट इशाराच दिला आहे. आमच्या घामाचा मोबदला मागायला जाणाऱ्या शेतकऱ्याला शिव्या दिल्या जातात, असे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले आहेत.

सिद्धराम म्हेत्रे यांच्यावरून लक्षात येतंय की अक्कलकोटची संस्कृती कुठल्या थराला गेली आहे, असे म्हणत राजू शेट्टी यांनी सिद्धराम म्हेत्रे यांचा समाचार घेतला आहे. सोलापुरातील काँग्रेस भवनासमोर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राजू शेट्टी आहे होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर देखील घणाघाती टीका केली आहे.
गुंडाप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात टोळीयुद्ध सुरू आहे. त्यामुळे जनतेच्या मुळ मुद्द्याकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढताना दिसत आहे, पण महाविकास आघाडीमधील नेते यावर काहीच बोलत नाही, असेही राजू शेट्टी म्हणाले.

बिघडलेल्या नटांची पोरं गांजा ओढतात, त्यावर सर्वांच लक्ष आहे. मात्र, इथं आंदोलन करणाऱ्या शेतकरीकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही, असा टीका देखील राजू शेट्टी यांनी केली आहे.
दरम्यान, ऐन दिवाळीच्या काळात शेतकरी आंदोलन करत आहे. मात्र पोलीस त्यांच्यावरच कारवाई करत आहे. ही शरमेची गोष्ट असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.