Take a fresh look at your lifestyle.

पारनेरातील ‘या’ सरपंचांनी केली हजार आदिवासी कुटुंबाची दिवाळी गोड !

पारनेर : तालुक्यातील म्हसोबा झाप येथे सरपंच प्रकाश गाजरे यांनी आपल्या ग्रामपंचायत मधील हजार आदिवासी कुटुंबांना दिवाळीचे औचित्य साधत फराळ वाटप केले व आदिवासींची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला.
सर्वसामान्यांची व आदिवासी कुटुंबाची दिवाळी गोड होण्यासाठी सरपंच प्रकाश गाजरे यांनी निलेश लंके प्रतिष्ठान व संघर्ष ग्रुप च्या माध्यमातून यावेळेस गरिबांची दिवाळी हा विशेष उपक्रम राबवत ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यावर जात आदिवासी एक हजार कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप केले. सरपंच प्रकाश गाजरे यांनी आमदार निलेश लंके यांच्या दातृत्वाची परंपरा या दिवाळीमध्ये जपली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सरपंच प्रकाश गाजरे हे सामाजिक काम करत आहेत.
दरम्यान तसेच आपल्या म्हसोबा झाप ग्रामपंचायत मधील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एक किलो साखर याप्रमाणे जवळजवळ चार टन साखरेचे वाटप या दिवाळीमध्ये सरपंच प्रकाश गाजरे यांनी केले असून दिवाळीमध्ये आदर्श उपक्रम राबवून सर्वसामान्यांची दिवाळी गोड केली आहे. आदिवासी व सर्वसामान्य कुटुंबाची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न संघर्ष ग्रुप व निलेश लंके प्रतिष्ठान च्या माध्यमातून आदर्श सरपंच प्रकाश गाजरे यांनी केला आहे.
दरम्यान सामाजिक कामांच्या माध्यमातून नेहमीच काम करणारे व उपक्रमशील सरपंच म्हणून पारनेर तालुक्यात ओळख निर्माण झालेले सरपंच प्रकाश गाजरे यांनी दिवाळीमध्ये राबविलेला गरिबांची दिवाळी हा उपक्रम निश्चित सर्वसामान्य व गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारा आहे.
सरपंच प्रकाश गाजरे हे आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून दिवाळीमध्ये आदिवासी कुटुंबासाठी गोरगरिबांची दिवाळी हा सामाजिक उपक्रम राबवत पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक दातृत्वाची परंपरा सरपंच प्रकाश गाजरे यांनी जपली आहे.

समाजा मध्ये काम करत असताना समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून या दिवाळीमध्ये आदिवासी सर्वसामान्य कुटुंबाला दिवाळीत चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी एक हजार कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप म्हसोबा झाप ग्रामपंचायत मध्ये केले
प्रकाश गाजरे
(सरपंच म्हसोबा झाप, पारनेर)