4.6 C
New York
Saturday, March 2, 2024

Buy now

पारनेर तालुक्यातील “या” पतसंस्थेवर अखेर प्रशासक

पारनेर : कान्हूर पठार येथील राजे शिवाजी पतसंस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा निबंधक गणेश पुरी यांनी राहात्याचे सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

राजे शिवाजी पतसंस्थेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर १४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्य दिवशी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १३ जागांसाठी केवळ सहा अर्ज शिल्लक राहिले. गणपुर्ती होत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक गणेश औटी यांनी संस्थेवर प्रशासक नियुक्त करण्याची शिफारस सहकार विभागाकडे केली होती. त्यानुसार संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच खेडकर हे प्रशासकाची सुत्रे हाती घेणार आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या