लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज लग्नानंतर प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य बदलतं. कारण आता प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला विचारणारं, टोकणारं कुणी तर आलेलं असतं. त्यामुळे पूर्वीच्या आणि आत्ताच्या जगण्यात फरक जाणवायला लागतो. म्हणून लग्नानंतर सुरू झालेल्या आव्हानांना कसे हाताळायचे? बदलांना कसे सामोरे जायचे? याबाबत पाहूयात…
● लग्नानंतर तुमच्या समोर नवीन गोष्टी येतात. अनेकदा जोडीदार लग्नाआधी जे रहस्य सांगण्यात संकोच वाटतो ते देखील शेअर करतो. अशा वेळी आपण आपल्या पार्टनरचा आदर करा.
● लग्नानंतरच अनेक नवीन गोष्टींशी जुळवून घेणे सोपे नसते. अशा परिस्थितीत संयम राखणे आवश्यक आहे. तसेच तत्काळ प्रतिक्रिया देणे टाळले पाहिजे.
● लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस मजेने जातात. मात्र काळानुसार गोष्टी बदलत जातात. लग्नानंतर एकदा अशी वेळ येईल जेव्हा आपल्याला आपल्यासाठी काही वेगळ्या वेळेची आवश्यकता वाटेल.
● लग्नाबरोबर जबाबदाऱ्या वाढू लागतात. मग काही दिवसांनंतर त्या जबाबदारी ओझे वाटू लागते. अशा परिस्थितीत जबाबदाऱ्या शेअर करा.
● आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पैसे आवश्यक असतात. अशात पैशाअभावी अनेकदा जोडप्यांमध्ये भांडण होते. त्यामुळे त्याचे व्यवस्थित नियोजन करा.