Take a fresh look at your lifestyle.

स्वार्थासाठी केलेली मैत्री एक दिवस घात करणारच !

मानसन्मान देणारे कोण आहेत हे अधिक महत्त्वाचे आहे.

 

महाभारतातील कर्ण आणि श्रीकृष्ण संवाद मोठा महत्वपूर्ण आहे. जीवनाचा अर्थ सांगणारं आहे. कर्ण युधिष्ठिराच्या मैत्रीने अंग देशाचा राजा बनला.त्यामुळे त्याला मानसन्मान मिळाला. दुर्योधनासोबत जाणे अनैतिक आहे हे भगवान श्रीकृष्ण जेव्हा कर्णाला सांगतात तेव्हा कर्ण म्हणतो,माझा जन्म कुंतीच्या पोटी झाला तेव्हा तीचा विवाह झाला नव्हता त्यामुळे तिने माझा त्याग केला यात माझा काय दोष होता?

एका कोळ्याने माझा सांभाळ केल्याने मला द्रोणाचार्यांनी क्षत्रिय नसल्याचे सांगुन युद्धप्रशिक्षण देण्यास नकार दिला.गुरू परशुरामांनी मला युद्धपारंगत केले पण मी कुंतीपुत्र क्षत्रिय आहे हे समजल्यावर त्यांनी मला शाप दिला की ऐन युद्धात तुला यातलं काहीच आठवणार नाही. अजाणतेपणाने एका गाईला माझा बाण लागला तर त्या गाईमालकाने मला शाप दिला. द्रौपदी स्वयंवरात माझी बदनामी करण्यात आली.माता कुंतीने सुद्धा मी तिचा पुत्र आहे हे केव्हा सांगितले जेव्हा पांडवाना माझ्यापासून धोका आहे हे समजल्यावर.माझा सर्वांनी धिक्कार केला मात्र दुर्योधनाने मला मानसन्मान दिला,राजा बनवले.मग मी दुर्योधनपक्ष स्विकारला तर यात चुकीचे काय आहे?

यावर भगवान श्रीकृष्ण जे उत्तर देतात ते जीवनमार्गदर्शन करणारं आहे. आमच्यावर कठीण प्रसंग आला तर आम्ही वाट्टेल त्याची मदत घ्यायला तयार असतो.त्याने संकट टळेलही पण मदत दुर्जनाची घेतली तर त्याचे यथोचित परिणाम पुढचं जीवन अंधकारमय करु शकतं.भगवान श्रीकृष्ण म्हणतात,

कर्णा..माझा जन्म कारागृहात झाला,माझ्या जन्माअगोदरच माझा मृत्यू माझी वाट पहात होता.माझा जन्म झाला त्याक्षणी मला माझ्या माता पित्यांपासुन दुर जावं लागलं.

तु लहानपणापासून तलवार, बाण,ढालींचा खणखणाट ऐकत निर्भयपणे मोठा झाला.पण माझ्यावर सतत मृत्यू घिरट्या घालीत होता.त्या दहशतीतच मी मोठा झालो.जरासंधापासुन वाचण्यासाठी मी यमुनातट सोडून माझ्या नातेवाईकांना घेऊन दुर समुद्रकिनारी गेलो.उद्या तु कौरवांसोबत जाऊन युद्ध जिंकलस तर तुझा उदोउदो होणार आहे. पण मला काय मिळणार आहे?हे युद्ध मी घडवून आणल्याचा दोष मला लागणार आहे.कर्णा लक्षात ठेव जीवन इतकं सहज नाही सोपं नसतच.

आम्ही वाईट परिस्थितीत कसं वागलो हे अधिक महत्वपूर्ण आहे.आमच्यावर अन्याय झाला,आम्ही पराजीत झालो,बदनामी वाट्याला आली तेव्हा आमच्या प्रतिक्रिया काय असतील त्यावर आमचं भाग्य जन्म घेणार आहे.सुसंस्कृत व्यक्तीला अन्यायाविरुद्ध अनितीचा अवलंब करण्याची वेळ येत नाही.त्याचा सुसंस्कृतपणा त्याला जे करायला लावते तेच त्याचं हत्यार आहे. महागड्या चपला घातल्यानं जीवनप्रवास आनंदी होणार नाही तर चांगल्या संस्काराने,नियतीने,चांगल्यांच्या सहवासाने जीवनप्रवास परिपूर्ण होत असतो.नेहमी सत्यपक्षात असलं पाहिजे.

रामकृष्णहरी