Take a fresh look at your lifestyle.

📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸 7 नोव्हेंबर 2021

 

▪️मेष : नवीन गोष्टी अमलात आणा. कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये.
▪️वृषभ : धैर्याने परिस्थिती हाताळावी. घरात खबरदारी घेऊन काम करावे. मन शांत ठेवून कार्यरत राहावे. कार्यालयीन सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता.
▪️मिथुन : आजचा दिवस चांगला जाईल. घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल. आपली उपासना सफल होईल.

▪️कर्क : भौतिक सुखाचा आनंद घ्याल. समोरच्या व्यक्तिमधील चुका काढत बसू नका. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. दिनक्रम व्यस्त राहील.
▪️सिंह : कुटुंबासमवेत वेळ घालवाल. घरात शांततेचे वातावरण राहील. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल.
▪️कन्या : कामानिमित्त प्रवास घडेल. सर्वत्र आनंद शोधाल. अचानक खर्च उद्भवू शकतात. कष्टाच्या मानाने यश पदरी पडेल. स्पर्धेत यश मिळवाल.

▪️तूळ : मित्रांचे सहकार्य लाभू शकेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. अनावश्यक खर्च कमी करा. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका.
▪️वृश्चिक : अनावश्यक खर्च उद्भवतील. केलेला संकल्प पूर्ण होईल. आपले विचार लोकांसमोर मांडाल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतील.
▪️धनू : आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घरासंबंधीची कामे पूर्ण करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भौतिक गोष्टींचा अनुभव घ्याल.

▪️मकर : मनातील इच्छा पूर्ण होईल. आपला संयम कमी येईल. अति साहस दाखवू नका. आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा.
▪️कुंभ : मनातील नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. छोटे प्रवास संभवतात. व्यवसायिकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल.
▪️मीन : घरात अतिथी जमतील. नवीन संधी चालून येऊ शकते. लहान प्रवास कराल. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता. पदोन्नतीचे योग संभवतात.