Take a fresh look at your lifestyle.

सिव्हिल हॉस्पिटलच्या आगीत किन्हीच्या रूग्णाचा भाजून मृत्यू !

शॉर्ट सर्किटमुळे लागली आग.

पारनेर : नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसीयूला लागलेल्या भीषण आगीत तालुक्यातील किन्ही (बहिरोबावाडी) येथील भिवाजी सदाशिव पवार या रुग्णाचा भाजून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
 नगर येथील सिव्हील हॉस्पिटलला आज सकाळी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग विझविण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करीत आहेत दरम्यान, किन्ही येथील भिवाजी सदाशिव पवार हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती मात्र आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
 या आगीची माहिती समजताच नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी हॉस्पिटलला धाव घेतली तर पद्मश्री पोपटराव पवार हे ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत होते. दरम्यान या आगीत आणखी किती रुग्णांचा मृत्यू झाल्याचा याची अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. तसेच याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.